viral AI photo trend | भेटा स्वतःच्याच बालरूपाला!

viral AI photo trend |
viral AI photo trend | भेटा स्वतःच्याच बालरूपाला!
Published on
Updated on

नवी दिल्ली : सध्या भारतातील इन्स्टाग्राम युजर्समध्ये एक नवा आणि अनोखा विजुअल ट्रेंड मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या ट्रेंडचे नाव आहे ‌’मीट युअर यंगर सेल्फ‌’. या ट्रेंडमध्ये चॅटजीपीटी आणि इतर एआय टूल्सच्या मदतीने लोक आपल्या सध्याच्या रूपाला चक्क स्वतःच्या बालपणीच्या रूपासोबत एकाच फेममध्ये उभे असल्याचे दाखवत आहेत.

हा नवा फॉरमॅट जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा आणि आपली प्रगती सांगण्याचा एक उत्तम मार्ग ठरला आहे. यामुळे हे फोटो केवळ सामान्य एडिटिंग न वाटता एखाद्या चित्रपटातील सीनसारखे भासतात. या ट्रेंडमध्ये दोन वेगवेगळ्या कालखंडांना, म्हणजेच तुमचे बालपण आणि तुमचे आजचे रूप यांना एका चित्रात जोडले जाते. यासाठी युजर्स आपले एक सध्याचे आणि एक बालपणातील फोटो वापरतात. एआय टूल्स या दोन्ही फोटोंना अशा प्रकारे मिक्स करतात की ते अत्यंत वास्तववादी वाटतात. अनेक फोटोंमध्ये दोन्ही रूपे एकमेकांकडे पाहताना किंवा बोलताना दाखवली जातात, जे काळानुसार झालेला बदल खूप सुंदरपणे अधोरेखित करतात.

तुम्ही देखील खालील सोप्या स्टेप्स फॉलो करून हा ट्रेंडिंग फोटो तयार करू शकता: १. फोटो निवड : तुमचा आजचा एक स्पष्ट आणि चांगल्या प्रकाशातील फोटो निवडा. २. बालपणीचा फोटो : तुमच्या बालपणातील असा फोटो निवडा ज्यामध्ये तुमचा चेहरा स्पष्ट दिसत असेल. ३. एआय टूल : चॅटजीपीटी (इमेज सपोर्ट असलेले) किंवा कोणतेही एआय इमेज जनरेटर टूल ओपन करा. ४. प्रॉम्प्ट टाइप करा : फोटो तयार करण्यासाठी सविस्तर सूचना लिहा. ५. इमेज सेव्ह करा : फोटो जनरेट झाल्यावर तो सेव्ह करा आणि इन्स्टाग्रामवर छानशा कॅप्शनसह शेअर करा.

एआय टूलला अचूक सूचना देण्यासाठी तुम्ही पुढील इंग्रजी प्रॉम्प्टचा वापर करू शकता : ‌‘Create an ultra- realistic photo of me and my younger self side by side. Use soft cinematic light and a simple background. Younger self on left smiling, present self looking at younger self with calm expression, high photographic quality. Aspect ratio 4:5.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news