Police AI Task Force : आता रस्त्यावर दिसणार ‌‘रोबोकॉप‌’

पुढील दोन वर्षांत पोलिस दलात ‌’एआय‌’ रोबो
Police AI Task Force
आता रस्त्यावर दिसणार ‌‘रोबोकॉप‌’
Published on
Updated on

न्यूयॉर्क ः विज्ञानावर आधारित चित्रपटांमधील कल्पना आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहेत. एका नवीन अभ्यासानुसार, येत्या दोन वर्षांत पोलिस विभाग आपल्या गस्त घालण्याच्या मूलभूत कामांसाठी ‌‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स‌’ (एआय) क्षमता असलेल्या रोबोचा वापर सुरू करणार आहेत. हे प्रगत रोबो गुन्हेगारी रोखण्यासाठी, संशयितांचा पाठलाग करण्यासाठी आणि अतिधोकादायक मोहिमांमध्ये मानवी पोलिसांना मदत करण्यासाठी सज्ज असतील.

1987 मध्ये आलेल्या ‌‘रोबोकॉप‌’ चित्रपटाने लोकांना पहिल्यांदा पोलिस रोबोची ओळख करून दिली होती. तेव्हा निर्माण झालेली उत्सुकता आणि भीती आता वास्तवात बदलत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ डेलावेअरचे प्राध्यापक इवान सन यांच्या मते, हे रोबो केवळ बॉम्ब निकामी करण्यापुरते मर्यादित राहणार नाहीत. या मशिनवर गोळीबार झाला किंवा सुऱ्याने वार झाले, तरी त्या निकामी होणार नाहीत. न थकता ते लांब अंतरापर्यंत गुन्हेगारांचा पाठलाग करू शकतात. हाय-स्पीड चेसिंग (पाठलाग) आणि बळाचा वापर करणे आता केवळ कल्पनेत राहिलेले नाही, तर ते लवकरच वास्तवात येणार आहे. अनेक देशांनी आधीच या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. चीन : सीमावर्ती भागात वाहतूक नियंत्रणासाठी ह्युमनॉईड (मानवासारखे दिसणारे) रोबो तैनात करण्यात आले आहेत.

थायलंड : गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 360-डिग््राी व्हिजन असलेले रोबो पोलिस दलात समाविष्ट केले आहेत. अमेरिका आणि सिंगापूर : येथील कॅसिनो आणि शॉपिंग मॉल्समध्ये सुरक्षेसाठी चाकांवर चालणारे रोबो कार्यरत आहेत. बिटन : सार्वजनिक ठिकाणी संशयितांची ओळख पटवण्यासाठी ‌‘एआय फेशियल रिकग्निशन‌’ तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, हे प्रगत रोबोटिक सिस्टम 200 मीटरपेक्षा जास्त अंतरावरून शत्रूचा धोका आणि त्यांच्याकडील शस्त्रे ओळखण्यास सक्षम असतील. इतकेच नाही, तर परिस्थितीनुसार त्वरित निर्णय घेण्याची क्षमताही त्यांच्यामध्ये विकसित केली जात आहे. प्राध्यापक सन यांच्या मते, रोबो पोलिसांची जागा पूर्णपणे घेणार नाहीत, तर ते पोलिसांचे मदतनीस म्हणून काम करतील. विशेषतः ‌‘हाय-रिस्क‌’ (अतिधोकादायक) वातावरणात मानवी पोलिसांचा जीव वाचवण्यासाठी या मशिनचा वापर अत्यंत फायदेशीर ठरेल. प्रशिक्षित पोलिस कर्मचाऱ्यांसोबत या मशिनचा वापर केल्यास गुन्हेगारी नियंत्रणात मोठी क्रांती होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news