AI in sports | खेळातही येतोय एआय

AI in sports |
AI in sports | खेळातही येतोय एआय
Published on
Updated on

लंडन; वृत्तसंस्था : कॉलेज बास्केटबॉलमध्ये आता केवळ मैदानावरील खेळ नव्हे, तर डेटा, विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचाही मोठा प्रभाव दिसू लागला आहे. इलिनॉय विद्यापीठाचा संघ आणि त्यांचे प्रशिक्षक ब्रॅड अंडरवूड यांनी याचा प्रभावी वापर करून संघाला फायनल फोरपर्यंत पोहोचवले आहे.

पूर्वी खेळाडूंची निवड मुख्यतः त्यांच्या कौशल्यांवर आधारित होत होती. मात्र, आता एआय-आधारित ‘प्रोफाईल’ या प्रणालीमुळे खेळाडूंच्या मानसिकतेचा, वर्तनाचा आणि टीमशी जुळवून घेण्याच्या क्षमतेचा सखोल अभ्यास केला जातो. ही प्रणाली छड ब्राऊन यांनी विकसित केली आहे.

उदाहरण म्हणून मार्कस डोमास्क याची निवड पाहता येईल. सुरुवातीला अंडरवूड यांनी त्याला नाकारले होते; परंतु आधारित विश्लेषणाने त्याच्या टीमवर्क, मेहनत आणि शिकण्याच्या वृत्तीवर प्रकाश टाकला. परिणामी, त्याची निवड झाली आणि त्याने उत्कृष्ट कामगिरी करत संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रणाली प्रशिक्षकांना काही सेकंदांत महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करते. उदाहरणार्थ: कोणत्या खेळाडूला कोणती भूमिका द्यावी? सामना सुरू होण्यापूर्वी त्याची मानसिक तयारी कशी असावी?

कोणता खेळाडू ‘स्टार’, ‘सपोर्ट’ किंवा ‘स्टॅबिलायझर’ ठरू शकतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे त्वरित देते, ज्यामुळे प्रशिक्षकांचा वेळ आणि ऊर्जा वाचते.

‘डेटा-ड्रिव्हन’ संघ व्यवस्थापन

अंडरवूड म्हणतात की, आजचे संघ मोठ्या कंपन्यांसारखे झाले आहेत. एआयच्या मदतीने प्रत्येक खेळाडूचा सखोल अभ्यास करून त्याला योग्य भूमिका दिली जाते. यामुळे संघातील समन्वय आणि कामगिरी सुधारते. इलिनॉय संघात विविध देशांतील खेळाडू आहेत. वेगवेगळ्या संस्कृती आणि मानसिकतेच्या खेळाडूंना एकत्र आणणे हे मोठे आव्हान होते. मात्र, एआय-आधारित विश्लेषणामुळे त्यांच्या सामंजस्यात वाढ झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news