Solar Energy : सौर पॅनल्सच्या खाली शेती करणे अधिक फायदेशीर!

संशोधनात नवा खुलासा
Solar Energy
सौर पॅनल्सच्या खाली शेती करणे अधिक फायदेशीर!
Published on
Updated on

न्यू जर्सी : वाढत्या जागतिक लोकसंख्येला अन्‍नाचा पुरवठा करण्यासाठी जमिनीची गरज वाढत असतानाच, दुसऱ्या बाजूला २०५० पर्यंत ‘सौरऊर्जा’ हा जगभरातील ऊर्जेचा एक प्रमुख स्रोत बनण्याची शक्यता आहे. मात्र, मोठे सोलर प्रोजेक्‍टस्‌ उभारण्यासाठी शेतीयोग्य जमिनीचा वापर केला जात असल्याने अन्‍न विरुद्ध ऊर्जा असा संघर्ष निर्माण झाला आहे. या समस्येवर ‘ॲग्रीव्होल्टेईक्स’ (Agrivoltaics) म्हणजेच सोलर पॅनल्सच्या खाली किंवा दोन ओळींच्या दरम्यान पिके घेण्याचे तंत्रज्ञान एक क्रांतिकारी उपाय ठरत आहे. नवीन संशोधनानुसार, सोलर पॅनल्सच्या खाली पिके घेतल्याने जमिनीचा वापर अधिक कार्यक्षमतेने होतो, पिकांना सावली व संरक्षण मिळते, मातीतील ओलावा टिकून राहतो आणि शेतात काम करणाऱ्या मजुरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळतो.

यापूर्वी झालेले संशोधन हे केवळ सूर्यप्रकाशाची उपलब्धता किंवा पिकांची वाढ यासारख्या एकाच घटकावर केंद्रित होते. परंतु, होसेनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक नवीन संगणकीय मॉडेल विकसित केले आहे. हे मॉडेल सोलर पॅनल्सच्या खाली निर्माण होणारे सूक्ष्म-हवामान (Microclimate), पिकांचे प्रकार, प्रकाश आणि सोलर पॅनलचे प्रकार यांच्यातील गुंतागुंतीच्या परस्परसंबंधांचा एकत्रित अभ्यास करते. या मॉडेलद्वारे खालील घटकांचा अचूक अंदाज लावता येतो : सोलर पॅनल्स, पिके, माती, हवा आणि पाण्याचा प्रवाह यांच्यातील ऊर्जा व वस्तुमानाची देवाणघेवाण. पिकांद्वारे होणारे कार्बन डायऑक्साईडचे ग्रहण. प्रत्यक्ष शेतात काम करताना शेतमजुरांना सहन करावा लागणारा उष्णतेचा ताण. आपले मॉडेल प्रत्यक्ष परिस्थितीशी किती तंतोतंत जुळते हे तपासण्यासाठी संशोधकांनी अमेरिकेतील वेगवेगळ्या ठिकाणांच्या आकडेवारीचा वापर केला. त्यांनी कॅलिफोर्नियातील ‘डेव्हिस’ येथील पानांचे तापमान आणि मिनेसोटातील ‘शिकागो सिटी’ येथील मातीच्या तापमानाची आकडेवारी एकत्रित करून मॉडेलची अचूकता तपासली.

त्यानंतर, संशोधकांनी न्यू जर्सीतील ‘प्रिन्स्टन’ या उष्ण आणि दमट हवामान असलेल्या भागातील हवामानाच्या आकडेवारीचा वापर करून एका काल्पनिक टोमॅटोच्या शेतीवर या मॉडेलची चाचणी घेतली. हा प्रदेश दाट लोकवस्तीचा असून येथे अन्‍न आणि ऊर्जा या दोन्ही गोष्टींची मागणी सर्वाधिक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news