

बरेली : भारतीय कृषी संशोधन परिषद (खउअठ) अंतर्गत असलेल्या ‘भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने’ (खतठख) देशी गोवंशाच्या संवर्धनात एक मैलाचा दगड गाठला आहे. संस्थेच्या शास्त्रज्ञांनी प्रगत प्रजनन तंत्रज्ञानाचा (ईीळीींशव ठशिीेर्वीलींर्ळींश ढशलहपेश्रेसळशी) वापर करून ‘साहीवाल’ या भारतीय जातीच्या वासरांची यशस्वी पैदास केली आहे.
संस्थेने पहिल्यांदाच ओव्हम पिक-अप, इन विट्रो फर्टिलायझेशन आणि एम्बि—यो ट्रान्स्फर (जझणड्ढ खतऋड्ढ एढ) या अत्याधुनिक पद्धतीचा वापर केला आहे. या प्रक्रियेत गायीच्या शरीरातून बीजांडे काढून प्रयोगशाळेत त्यांचे फलन केले जाते आणि नंतर ते गर्भ दुसर्या गायीमध्ये (सरोगेट मदर) प्रत्यारोपित केले जातात. 28 फेब—ुवारी 2026 पासून केवळ पाच दिवसांच्या कालावधीत पाच निरोगी साहीवाल वासरांचा जन्म झाला आहे. या प्रयोगासाठी निवडलेली दाती (ऊेपेी) गाय ही दिवसाला 12 लिटरपेक्षा जास्त दूध देणारी होती, तर वापरण्यात आलेले वळूचे वीर्य अशा वळूचे होते, ज्याच्या मातेचे दूध उत्पादन सुमारे 3,320 किलो (एका वेतात) होते. यामुळे जन्माला आलेली वासरे अनुवंशिकद़ृष्ट्या अत्यंत सक्षम असणार आहेत. 2022-23 मध्ये सुरू झालेल्या या मोहिमेत केवळ सहीवालच नव्हे, तर थारपारकर गायी आणि मुर्हा म्हशींच्या अनुवंशिक सुधारणेवरही भर दिला जात आहे. भ्रूण विकासाचा दर गायींमध्ये 47 टक्के आणि म्हशींमध्ये 42 टक्क्यांपेक्षा जास्त राहिला आहे, जो जागतिक स्तरावरील आघाडीच्या प्रयोगशाळांच्या बरोबरीचा आहे. खतठख आता हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर राबवणार असून, यामुळे उच्च दर्जाच्या देशी गायी आणि म्हशींची संख्या झपाट्याने वाढण्यास मदत होईल. केवळ संशोधनच नाही, तर या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष लाभ पशुपालकांना व्हावा, यासाठी संस्था प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणार आहे. यामुळे पशुपालन क्षेत्रात नवीन स्टार्टअप्स आणि कुशल व्यावसायिकांना चालना मिळणार आहे.