France Garden Treasure Found | खोदकाम करताना सापडला खजिना!

France Garden Treasure Found
France Garden Treasure Found | खोदकाम करताना सापडला खजिना!
Published on
Updated on

पॅरिस : कधी कधी खोदकाम करताना अपघातानेच जुन्या काळात पुरून ठेवलेला सोन्याचा खजिना सापडल्याच्या घटना जगभर घडलेल्या आहेत. काही ठिकाणी मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने मुद्दामच असा शोधही घेतला जात असतो. आता फ्रान्समध्ये एका माणसाला आपल्या घराच्या बागेतच खोदकाम करीत असताना सोन्याचा खजिना आढळून आला आहे. त्याची किंमत भारतीय चलनात तब्बल सात कोटी रुपये आहे!

फ्रान्समधील ही व्यक्ती आपल्या घराच्या बागेत खोदकाम करत होती. तेवढ्यात त्याला हा सोन्याचा मोठा खजिना आढळला. त्याला जमिनीत अनेक पिशव्या पुरून ठेवलेल्या आढळून आल्या, या पिशव्यांमध्ये सोन्याची बिस्किटं आणि नाणी आढळली. हा खजिना सापडल्याने ही व्यक्ती क्षणात मालामाल झाली आहे. हे संपूर्ण सोनं आता त्याच्या मालकीचं झालं आहे. तपास केल्यानंतर अधिकार्‍यांनी हा खजिना त्या व्यक्तीच्या मालकीचा असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अचानक ही व्यक्ती श्रीमंत झाली आहे.

याबाबत, स्थानिक अधिकार्‍यांनी सांगितलं की, या व्यक्तीला त्याच्या घराच्या बागेत स्विमिंग पूल बांधायचा होता. त्यामुळे त्याने बागेत खोदकाम सुरू केले. याचवेळी त्या व्यक्तीला जमिनीत काहीतरी दिसून आलं. तिथे अनेक पिशव्या पुरून ठेवलेल्या होत्या. जेव्हा त्याने या पिशव्या बाहेर काढल्या आणि उघडल्या तेव्हा त्याला आनंदाचा धक्काच बसला. कारण, या पिशव्यांमध्ये त्याला सोन्याचा खजिना दिसून आला. या व्यक्तीला मिळालेल्या या सोन्याच्या खजिन्याची किंमत 7,00,000 यूरो म्हणजेच भारतीय चलनात तब्बल सात कोटी रुपये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news