

सॅन जोस : आज ‘झूम’ हे जगात सर्वाधिक लोकप्रिय व्हिडीओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. पण, याच्या प्रचंड यशाची मुळं एका प्रेम कहाणीत दडलेली आहेत. संस्थापक एरिक युआन यांच्या तारुण्यातील एका प्रेम कथेनेच ती कल्पना जन्माला घातली, जी पुढे ’झूम’ला जगातील सर्वात मोठं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म बनवून गेली.
चीनच्या एका कॉलेजमध्ये शिकत असताना एरिक युआन यांची भेट शेरी यांच्याशी झाली होती. दोघे वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकत होते आणि एकमेकांना भेटण्यासाठी त्यांना दर आठवड्याला 10 तासांचा लांब रेल्वे प्रवास करावा लागत असे. हा दमवणारा प्रवास एरिक यांना अस्वस्थ करत होता. याच दरम्यान त्यांच्या मनात एक कल्पना आली: दूर असलेल्या लोकांना समोरासमोर असल्यासारखं जोडणारा एक प्लॅटफॉर्म तयार करायचा! कॉलेज संपल्यानंतरही हे स्वप्न एरिक यांच्या मनात कायम होतं.
अखेरीस, ते 1997 मध्ये सिलिकॉन व्हॅलीत पोहोचले आणि WebEx कंपनीत रुजू झाले. विशेष म्हणजे, त्यांना अमेरिकेचा व्हिसा सलग 8 वेळा नाकारण्यात आला होता; पण त्यांनी हिंमत सोडली नाही. 2007 मध्ये WebEx चं अधिग्रहण झाल्यावर ते ‘सिस्को’ मध्ये इंजिनिअरिंगचे उपाध्यक्ष बनले. येथे एरिक यांनी एक सोपी व्हिडीओ कॉलिंग सिस्टीम बनवण्याचा विचार मांडला; पण त्यांच्या कल्पनेला वारंवार टाळण्यात आलं. शेवटी, एरिक यांनी नोकरी सोडली आणि आपलं स्वप्न स्वतः पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये एरिक युआन यांनी डररीलशश नावाच्या कंपनीची सुरुवात केली, ज्याचं नाव नंतर नेेा तळवशे र्उेााीपळलरींळेपी असं ठेवण्यात आलं. याचा उद्देश व्हिडीओ कनेक्शन इतकं सोपं करणं होतं की, कोणीही, कुठूनही, कोणत्याही अडथळ्याशिवाय एकमेकांशी बोलू शकेल.
2019 मध्ये ‘झूम’चा IPO ( Initial Public Offering) आल्यानंतर कंपनीचं मूल्य सुमारे 9 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलं. कोव्हिड-19 महामारीनंतर ‘झूम’ची लोकप्रियता गगनाला भिडली. केवळ दोन महिन्यांत वेब कॉन्फरन्सिंगची मागणी 418% ने वाढली आणि ‘झूम’ प्रत्येक घर, शाळा आणि कार्यालयाचा अविभाज्य भाग बनला. एरिक युआन यांचं म्हणणं आहे की, ‘झूम’ आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने नवीन युगातील संवाद आणि सहकार्याची व्याख्या करेल. कंपनी युनिफाईड कम्युनिकेशन आणि ग्राहक अनुभव मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत आहे. आज ‘झूम’ची बाजारपेठेतील किंमत (Market Cap) 23.5 अब्ज डॉलर इतकी आहे.