एका जनुकामुळे उंदीर बनतात पिलांचे शत्रू

A gene makes rats enemies of chicks
एका जनुकामुळे उंदीर बनतात पिलांचे शत्रूFile Photo
Published on
Updated on

प्रिन्स्टन : निसर्गात मादी आपल्या पिलांची काळजी घेताना नेहमीच दिसते. परंतु, नरांमध्ये पितृत्वाची भावना सर्वच प्राण्यांत सारखी नसते. आफ्रिकन पट्टेरी उंदरांवर केलेल्या एका नवीन संशोधनातून असे समोर आले आहे की, त्यांच्या मेंदूतील एका विशिष्ट ‘जेनेटिक स्विच’मुळे (अनुवांशिक बदल) अत्यंत प्रेमळ बाप आपल्याच पिलांवर हल्ला करू शकतो.

सस्तन प्राण्यांच्या 6,000 प्रजातींपैकी केवळ 5 टक्के प्रजातींमध्ये ‘सक्रिय पितृत्व’ पाहायला मिळते. यामुळेच शास्त्रज्ञांना मातांच्या तुलनेत पितृत्वाच्या अनुवांशिक पैलूंबद्दल कमी माहिती होती. संशोधकांना आढळले की, जेव्हा उंदरांच्या मेंदूतील "MPOA' (Medial Preoptic Area) या भागात "Agouti' नावाचे जनुक अधिक सक्रिय होते, तेव्हा ते उंदीर आपल्या पिलांशी हिंसक वागू लागतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ‘अगौटी’ जनुक प्रामुख्याने त्वचेचा रंग आणि चयापचय क्रियेसाठी ओळखले जाते. मात्र, या प्रयोगात जेव्हा शास्त्रज्ञांनी कृत्रिमरीत्या या जनुकाची सक्रियता वाढवली, तेव्हा शांत उंदीरही पिलांवर हल्ला करू लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news