

सिडनी : ऑस्ट्रेलिया हा जगातील सहाव्या क्रमांकाच्या मोठ्या देशांमध्ये समाविष्ट असलेला देश आहे. हा जगातील सर्वात लहान खंडही आहे. हे खंड क्षेत्रफळाच्या द़ृष्टीने इतके मोठे असूनही त्यात खूप कमी लोक राहतात. समोर आलेल्या रिपोर्टस्वर विश्वास ठेवला तर आपली राजधानी दिल्लीची लोकसंख्या ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा अडीच पट मोठा आहे. तुम्हाला माहिती आहे का की इतका मोठा प्रदेश असूनही, ऑस्ट्रेलियाचा 95 टक्के भाग निर्जन आहे, पण यामागचे कारण काय असेल?
ऑस्ट्रेलियाचे लोक कोस्टल रेग्युलेशन झोनजवळ राहतात. या खंडात राहण्यासाठी आलेले पहिले लोक आशियातील मूळ रहिवासी होते. यानंतर अमेरिका आणि युरोपमधील लोक येथे आले. तरीही या देशाची लोकसंख्या फक्त 2 कोटी 60 लाख इतकी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये राहण्यासाठी जागा नाही असे नाही, पण त्यातील जवळजवळ 95 टक्के जागा रिकामी आहे. एवढेच नव्हे तर येथे काही शहरे अशी आहेत जिथे फक्त 50 ते 100 लोक राहतात. ऑस्ट्रेलियन सरकारला येथील लोकसंख्या वाढवायचीय, पण लोकांना निर्जन शहरांमध्ये राहायचे नाही. ऑस्ट्रेलियाची भूमी एकूण 3 भागांत विभागली आहे. पहिला पश्चिम पठार आहे, जो ऑस्ट्रेलियाच्या तीन भागांना व्यापतो. त्याच्या 2 तृतीयांश क्षेत्रफळ वाळवंटाने व्यापलेले आहे. म्हणूनच येथे मानव राहू शकत नाही. त्याच्या दुसर्या भागाला मध्य सखल प्रदेश म्हणतात. हा पिवळा भाग एक सखल प्रदेश असून तेथील नद्यांचे पाणी खारे आहे. असे पाणी मानवांसाठी आणि शेतांसाठी चांगले नाही. तिसरा भाग पूर्व हाईलँडचा आहे. या भागात पर्वत आणि जंगले दोन्ही आहेत, मुळात ते एक भूभाग आहे. येथील जमीन सुपीक आहे आणि पिण्याचे पाणीही आहे, पण इथे राहणे लोकांना कठीण होत चाललंय, असे दिसून येते. ऑस्ट्रेलियाचा 95 टक्के भाग उजाड आणि ओसाड आहे. हा भाग वाळवंट असल्याने येथील दिवसाचे तापमान 50 अंशांच्या पुढे जाते. म्हणूनच हा भाग रिकामा राहतो. ऑस्ट्रेलिया हा जगातील एकमेव असा देश आहे जो एक खंड आणि एक बेट देश आहे. हा खंड सर्व बाजूंनी प्रशांत महासागर आणि हिंदी महासागराने वेढलेला आहे. जिथे सर्व प्रकारच्या सुविधा मिळतात आणि जमीन सुपीक असते, अशा ठिकाणी राहणे लोकांना आवडते. येथील जमीन 5 लाख वर्षांहून अधिक जुनी आहे. जमीन इतकी जुनी असल्याने येथील जमिनीची सुपीकता पूर्णपणे नाहीशी झालीय. या जमिनीच्या वरचा थर नाहीसा झाला आहे. ज्यामुळे या भागातील बहुतेक भाग वाळवंटी बनला आहे. शेती तर दूरच इथे कोणीही राहू शकत नाही. त्यामुळे इथला 95 टक्के भाग रिकामा आहे.