Spinosaurus discovery | 9.5 कोटी वर्षांपूर्वीच्या स्पिनोसॉरसचा शोध

Spinosaurus discovery
Spinosaurus discovery | 9.5 कोटी वर्षांपूर्वीच्या स्पिनोसॉरसचा शोध
Published on
Updated on

नियामे, नायजर : सुमारे 9.5 कोटी वर्षांपूर्वी सहाराचे वाळवंत आजच्यासारखे कोरडे नव्हते, तर नद्यांनी समृद्ध असलेले जंगल होते. याच प्रदेशात वावरणारा आणि हेल हेरॉन (भयानक बगळा) म्हणून ओळखला जाणारा एक नवा डायनासोर शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार, स्पिनोसॉरस मिराबिलिस ही नवीन प्रजाती डायनासोरच्या उत्क्रांतीचा नवा इतिहास सांगत आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोचे प्रसिद्ध जीवाश्मशास्त्रज्ञ पॉल सेरेनो यांच्या नेतृत्वाखालील टीमने पश्चिम आफ्रिकेतील नायजर देशामध्ये हे जीवाश्म शोधले. या डायनासोरच्या डोक्यावर तलवारीच्या आकाराचा उंच तुरा होता, जो सुमारे 20 इंच उंच असावा. शास्त्रज्ञांच्या मते, हा तुरा जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी किंवा प्रतिस्पर्ध्याला घाबरवण्यासाठी असावा. या डायनासोरची हाडे चक्क काळ्या रंगाची आढळली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञांमध्ये स्पिनोसॉरस हा माशांप्रमाणे पाण्यात पोहायचा की किनार्‍यावर राहायचा, यावर वाद सुरू होता. मात्र, सेरेनो यांच्या मते, हा डायनासोर एखादा जायंट बगळा (हेरॉन) असल्यासारखा वागत असे. तो खोल पाण्यात पोहण्यापेक्षा सुमारे 6-7 फूट खोल पाण्यात उभा राहून आपल्या तीक्ष्ण जबड्याने माशांची शिकार करायचा. त्याच्या पाठीवरील विशाल शिडासारख्या भागामुळे त्याला पाण्यात वेगाने पोहणे कठीण होते.

असा लागला शोध?

2019 मध्ये नायजरमधील एका स्थानिक मार्गदर्शकाने शास्त्रज्ञांना या दुर्गम ठिकाणापर्यंत पोहोचवले होते. 2022 मध्ये जेव्हा संपूर्ण कवटी सापडली, तेव्हा या नवीन प्रजातीवर शिक्कामोर्तब झाले. या डायनासोरचे दात मासे पकडण्यासाठी अत्यंत अनुकूल होते, जे खालच्या आणि वरच्या जबड्यात एकमेकांत अडकले जायचे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news