Smartphone Emojis | स्मार्टफोनवर येणार 9 नवीन इमोजी

लोणच्याची फोड आणि डोळे बारीक केलेला चेहरा ठरणार आकर्षण
smartphone emojis
Smartphone Emojis | स्मार्टफोनवर येणार 9 नवीन इमोजी
Published on
Updated on

मुंबई : आजच्या डिजिटल जगात आपण शब्दांपेक्षा इमोजीचा वापर अधिक करतो. सध्या आपल्याकडे 3,900 हून अधिक इमोजी उपलब्ध असताना, 2026 मध्ये यात आणखी 9 नवीन इमोजींची भर पडणार आहे. युनिकोडकडून या नवीन इमोजींची यादी समोर आली आहे. यावर्षी सप्टेंबर 2026 पर्यंत खालील इमोजी तुमच्या कीबोर्डवर दिसू शकतात.

डोळे मिचकावणारा चेहरा (स्क्वंटिंग फेस ) : हा चेहरा हसताना किंवा काहीतरी बारीक नजरेने पाहताना वापरता येईल.

डावीकडे दाखवणारा अंगठा (लेफ्टवार्ड थंब) : तिकडे बघ किंवा दिशा दर्शवण्यासाठी उपयुक्त.

उजवीकडे दाखवणारा अंगठा (राईटवार्ड थंब) : हा देखील दिशा दर्शवण्यासाठी वापरता येईल.

मोनार्क फुलपाखरू (मोनार्क बटरफ्लाय) : सध्याच्या फुलपाखरापेक्षा हे अधिक गडद आणि वेगळ्या प्रजातीचे असेल.

लोणच्याची फोड (पिकल) : ही इमोजी सोशल मीडियावर सर्वात जास्त चर्चेत आहे. काहींच्या मते, ही इमोजी वांग्याच्या (ऑबर्जिन) इमोजीची जागा घेऊ शकते.

दीपगृह (लाईटहाऊस) : समुद्रकिनारी असलेल्या प्रकाशस्तंभाची ही नवी इमोजी असेल.

उल्का (मेटिअर) : अवकाशातील पडत्या तार्‍यासाठी किंवा उल्केसाठी ही नवी डिझाईन असेल.

रबर (इरेझर) : चुका सुधारण्यासाठी किंवा खोडण्यासाठी वापरता येणारे रबर.

जाळे (नेट विथ अ हँडल) : फुलपाखरे किंवा मासे पकडण्यासाठी वापरले जाणारे हँडल असलेले जाळे.

नव्या इमोजी सप्टेंबरपर्यंत होणार उपलब्ध

सप्टेंबर 2026 पर्यंत युनिकोड 18.0 (18.0) अपडेटमध्ये या इमोजींना अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. एकदा युनिकोडने मंजुरी दिली की, अ‍ॅपल, सॅमसंग आणि गुगल या कंपन्या आपापल्या पद्धतीने या इमोजी डिझाईन करतील. त्यामुळे प्रत्यक्ष फोनमध्ये येण्यासाठी 2026 अखेर किंवा 2027 उजाडू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news