तब्बल 9.75 सेंमी लांब जीभ, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद

 longest tongue
तब्बल 9.75 सेंमी लांब जीभ, गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये नोंद
Published on
Updated on

न्यूयॉर्क ः जगभरात लोक विविध प्रकारचे अनोखे विक्रम प्रस्थापित करतात. कोणी पाण्यात जास्त वेळ श्वास रोखण्याचा विक्रम करतो, तर कोणी सर्वात लांब नखे वाढवण्याचा. अशाच एका अनोख्या विक्रमात, कॅलिफोर्नियामधील एका महिलेने आपल्या 9.75 सेमी (3.8 इंच) लांब जिभेसह गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. विशेष म्हणजे, ही जीभ आयफोनच्या लांबीइतकी आहे!

कॅलिफोर्नियामधील चॅनल टॅपर ही विद्यार्थिनी महिलांमध्ये आतापर्यंतची सर्वात लांब जीभ असण्याचा विक्रम नोंदवणारी ठरली आहे. तिच्या जिभेची लांबी 3.8 इंच (9.75 सेमी) आहे आणि या वैशिष्ट्यामुळे तिला गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये स्थान मिळाले आहे. टॅपरने सांगितले की, तिला पहिल्यांदा 8 वर्षांची असताना आपल्या लांब जिभेबद्दल समजले. ती आईसोबत हेलोवीन फोटोशूट करत असताना हा किस्सा घडला. त्या क्षणाला आठवत ती म्हणाली, ‘हेलोवीनची छायाचित्रे पाहिली तेव्हा लक्षात आले की माझी जीभ इतरांपेक्षा असामान्यरित्या लांब आहे.’ टॅपर आपल्या लांब जिभेमुळे लोकांच्या मजेदार आणि आश्चर्यचकित करणार्‍या प्रतिक्रिया पाहण्याचा आनंद घेते. ती म्हणते, ‘लोक माझी जीभ पाहून चकित होतात, काहीजण तर भीतीने किंचाळतात!’ तिच्या रेकॉर्ड ब—ेकिंग जिभेने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने तिचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news