उत्‍तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनचा नवा लूक

उत्‍तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनचा नवा लूक
Published on
Updated on

प्योंगयांग : उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन दीर्घकाळानंतर सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आला आहे. यावेळी किम यांचा नवा लूक पाहून सगळेच चकीत झाले. 37 वर्षांचे किम आधीपेक्षा अधिक फिट आणि सडपातळ दिसून आले.

किम दीर्घकाळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिले होते. या काळात त्यांच्या अत्यंत विश्वासू लोकांशिवाय त्यांचा ठावठिकाणा कुणालाही माहिती नव्हता. या दीर्घ 'अज्ञातवासा'नंतर गेल्या आठवड्यात त्यांनी वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत सहभाग घेतला. हाच पक्ष उत्तर कोरियात सत्तेवर आहे. या बैठकीत किम यांनी मोठे भाषण केले.

बि—टनमधून आलेल्या काही रिपोर्टसनुसार किम यांनी आपले वजन 19 किलोंनी कमी केले आहे. उत्तर कोरियात परदेशी माध्यमांना पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे तेथील अतिशय कमी माहिती जगाला समजते. बि—टिश दैनिक 'द डेली स्टार' ने दिलेल्या माहितीनुसार किम यांना डॉक्टरांनी लवकरात लवकर वजन घटवण्याचा सल्ला दिला होता. त्यांची उंची 5 फूट 7 इंच असून वय अवघे 37 वर्षे आहे. मात्र, त्यांच्या वजनाबाबत अचूक माहिती उपलब्ध नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news