बुडालेल्या चिनी जहाजांमधून बाहेर काढल्या अनेक जुन्या वस्तू

बुडालेल्या चिनी जहाजांमधून बाहेर काढल्या अनेक जुन्या वस्तू

बीजिंग : मिंग साम्राज्याच्या काळातील दक्षिण चीन समुद्रात बुडालेल्या दोन जहाजांमधील अनेक मौल्यवान वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत. ही जहाजे अनेक प्रकारच्या वस्तूंनी भरलेली होती. त्यापैकी 900 पेक्षाही अधिक वस्तू बाहेर काढण्यात आल्या असून, त्यामध्ये पोर्सेलिन बाऊल्स, तांब्याची नाणी आणि सुरईसारख्या अनेक भांड्यांचा समावेश आहे.

या जहाजांचा ऑक्टोबर 2022 मध्ये शोध लावण्यात आला होता. समुद्राच्या पृष्ठभागापासून 4900 फूट खोलीवर या जहाजांचे अवशेष आढळून आले होते. या समुद्राच्या उत्तरेस चीन, पश्चिमेस व्हिएतनाम आणि पूर्वेस फिलिपाईन्स आहे. त्याच्या तळाशी या जहाजांचे अवशेष आढळले होते. चीनच्या हेनान बेटावरील सान्या शहराच्या किनार्‍यापासून हे ठिकाण दीड किलोमीटर अंतरावर आहे.

2023 मध्ये संशोधकांनी या ठिकाणाचे मॅपिंग करण्यास आणि 'शेन्हाई योंगशी' (खोल समुद्रातील योद्धा) या नावाच्या डीप-सी सबमर्सिबल म्हणजेच पाणबुडीच्या सहाय्याने या जहाजांमधील वस्तू बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले होते. विशेष म्हणजे या जहाजांवरील अनेक वस्तू, कलाकृती अद्यापही सुस्थितीत आहेत. इसवी सन 1368 ते 1644 या काळात मिंग साम्राज्य होते. त्या काळातील अनेक सुंदर वस्तू, कलाकृती या जहाजांवर होत्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news