चीनमधील मंदिर, जेथे गेल्यावर होतो पश्चात्ताप! | पुढारी

चीनमधील मंदिर, जेथे गेल्यावर होतो पश्चात्ताप!

बीजिंग : चीनमध्ये ‘माऊंट ताईशान’ नावाचे एक ठिकाण असून येथून जवळच असलेल्या डोंगरावर एक मंदिर स्थित आहे. या मंदिरात पोहोचण्यासाठी लोकांना 6600 च्या पेक्षा जास्त शिड्यांनी चढावे लागते. या मंदिरात जाताना आणि तेथून परतताना लोकांचे पायच अक्षरश: गळाल्यासारखे होतात. लोटपोट होत लोक कसेबसे मंदिरातून बाहेर येतात. काही लोक स्ट्रेचरची मदत घेत खाली उतरतात. या मंदिरातील एक व्हिडीओ सध्या बराच व्हायरल झाला आहे.

‘एक्स’ अर्थात पूर्वाश्रमीच्या टि्वटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 38 सेकंदांचा हा व्हिडीओ सर्वांना अगदी थक्क करायला लावणारा ठरत आहे. लोक अतिशय उत्साहाने मंदिराकडे निघतात, पण साडेसहा हजारांपेक्षा अधिक कठीण पायर्‍या चढताना त्यांची निव्वळ दमछाक होते. असे निम्मा टप्पा पार पडण्यापूर्वीच त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येते, असे या व्हिडीओत स्पष्ट होते.

या व्हिडीओनुसार, काहींचे पाय थरथरत होते तर काहींना रडूही आवरत नाही. काही जण काठीच्या सहाय्याने उतरत होते तर काही स्ट्रेचरची मदत घेताना दिसून आले.

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक कमेंट येत आहेत. काहींनी या ठिकाणी जायला भीती वाटत असल्याचे सांगितले तर काहींनी पश्चात्तापच होणार असेल तर तेथे जायचे कशाला, असा प्रश्न उपस्थित केला.

Back to top button