₹1 Crore Prize | फक्त सात रुपये खर्च केले, १ कोटी मिळाले!

₹1 Crore Prize |
₹1 Crore Prize | फक्त सात रुपये खर्च केले, १ कोटी मिळाले!
Published on: 
Updated on: 

अमृतसर : आयुष्याच्या कोणत्या वळणावर कुणाचं नशीब फळफळेल हे सांगता येत नाही. पंजाबच्या कोटकपुरा येथे राहणाऱ्या एका मजुराच्या आयुष्यातही असाच अचानक बदल झाला आहे. या कुटुंबातील महिलेने केवळ सात रुपयांची एक लॉटरी खरेदी केली. तिला माहितही नव्हतं या तिकिटामुळे तिचं नशीब पालटणार आहे. या एका तिकिटाने तिचं आयुष्य रातोरात बदलणार आहे. दुसऱ्याच दिवशी या तिकिटाचा निकाल आला अन् या कुटुंबात दिवाळीच साजरी झाली. त्या सात रुपयांच्या तिकिटावर त्यांना तब्बल एक कोटीचं बक्षीस लागलं आणि या कुटुंबाचं नशीबच फळफळलं!

बिमलादेवी या संध्याकाळी रेल्वे रोडवर काही सामान खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी लॉटरी विकत घेण्याची त्यांना इच्छा झाली. त्या रेल्वे स्टेशनजवळच्या लॉटरी स्टॉलवर गेल्या. त्यांनी सिक्कीम सरकारची केवळ ७ रुपयांची लॉटरी घेतली. त्यांच्यासाठी ही नेहमीची खरेदी होती. आपल्या नशिबात फार मोठा चमत्कार घडेल हे तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं. तिकीट घेतल्यावर त्या घरी गेल्या. दुसऱ्या दिवशी या लॉटरीचा निकाल आला. त्यांना लॉटरी लागल्याचं कळताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांना एक कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. लॉटरीचा संचालक नरेश मोंगा यांना बक्षिसाबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी बिमलादेवीच्या कुटुंबीयांना त्याची माहिती दिली.

त्यामुळे बिमलादेवीच्या घरच्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. केवळ सात रुपयांत एवढी मोठी रक्कम मिळेल यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर संपूर्ण कुटुंब स्टॉलवर आलं. तेव्हा नरेश मोंगा यांनी त्यांना मिठाई भरवली. यावेळी सर्वांनी मिळून भांगडाही केला. यावेळी उत्सवासारखं वातावरण झालं होतं. आपल्या सर्व आर्थिक अडचणी मिटणार असल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं. एक कोटी रुपये मिळाल्यामुळे आता त्याचं काय करणार? असं बिमलादेवींना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी या पैशातून आमच्या आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. आता मुलांचं भविष्य घडवता येईल. मात्र, या पैशाचं काय करायचं हे अद्याप आम्ही ठरवलेलं नाहीये. आम्ही घरात बसू आणि त्यावर चर्चा करू. पण, मुलांसाठी काही तरी व्यवसाय सुरू करायचा हे आमच्या मनात आहे. कायमस्वरूपी उत्पन्नाचं एक साधन त्या निमित्ताने निर्माण होणार आहे, असं बिमलादेवी म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news