कॉम्प्युटरच्या माऊस चे ‘बारसे’ कसे झाले? | पुढारी

कॉम्प्युटरच्या माऊस चे ‘बारसे’ कसे झाले?

न्यूयॉर्क :

संगणकावर काम करण्यासाठी माऊसचा वापर होत असतो. माऊसशिवाय संगणकाचे अक्षरशः ‘पान हलत नाही’! स्क्रीनवर कोणतीही हालचाल करायची असेल किंवा एखाद्या आयकॉनवर क्लीक करायचे असेल तर ‘माऊस’ लागतोच. या उपकरणाला ‘माऊस’ म्हणजे छोट्या उंदराचे नाव कसे आले असेल असा प्रश्न अनेकांना पडू शकतो.

जून्या काळात संगणकाच्या या ‘माऊस’चे नाव वेगळेच होते. 1960 च्या दशकात डग्लस कार्ल एंगेलबार्ट यांनी माऊसचा शोध लावला. त्यावेळी या उपकरणाला ‘पॉईंटर डिव्हाईस’ असे म्हटले जात होते. हा माऊस त्यांनी लाकडापासून बनवला होता. त्याला धातुची दोन चाके होती. त्या काळात संगणकाचा आकार एखाद्या खोलीइतका होता हे विशेष!

ज्यावेळी हे उपकरण बनवण्यात आले त्यावेळी त्याचा आकार एखाद्या छोट्या उंदरासारखाच दिसत होता व त्यामुळे त्याला ‘माऊस’ म्हटले जाऊ लागले. गंमत म्हणजे या उपकरणाला ‘माऊस’ म्हणण्यास सुरुवात होण्याआधी त्याचे नाव ‘टर्टल’ म्हणजे ‘कासव’ असेही ठेवून पाहण्यात आले होते!

Back to top button