पृथ्वीवरील सर्वाधिक सूर्यप्रकाश मिळणारे ठिकाण | पुढारी

पृथ्वीवरील सर्वाधिक सूर्यप्रकाश मिळणारे ठिकाण

न्यूयॉर्क ः पृथ्वीवर सर्वाधिक सूर्यप्रकाश मिळणारे ठिकाण कोणते आहे याचा आता शोध घेण्यात आला आहे. चिलीमधील अटाकामा वाळवंटातील अल्टिप्लेनो हे ठिकाण असे ‘सनीएस्ट स्पॉट’ असल्याचे निष्पन्न झाले आहे. अँडीज पर्वताजवळील हे पठारावरील वाळवंट वर्षातून सर्वाधिक काळ सूर्यप्रकाशात राहते. हे ठिकाण जवळजवळ शुक्राइतकेच प्रकाशित आहे.

एरव्ही हे ठिकाण थंड आणि कोरडे असते. समुद्रसपाटीपासून 4 हजार मीटर उंचीवर हे ठिकाण आहे. त्याच्यापेक्षा अधिक उंचीवर असलेल्या ठिकाणांच्या किंवा विषुववृत्ताजवळ असलेल्या ठिकाणांपेक्षा या ठिकाणाला अधिक सूर्यप्रकाश मिळतो. ‘बुलेटिन ऑफ द अमेरिकन मेटियोरॉलॉजिकल सोसायटी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली. हे अटाकामा वाळवंट अनेक कारणांसाठी विशेष आहे. हे पृथ्वीवरील सर्वात जुने वाळवंट आहे. ते ध—ुवीय प्रदेशानंतरचे सर्वात कोरडे ठिकाणही आहे.

तसेच हे कदाचित पृथ्वीवरून रात्रीच्या आकाशाचे निरीक्षण करण्यासाठीचेही सर्वात स्वच्छ द़ृश्य दिसणारेही ठिकाण आहे. सूर्याकडून पृथ्वीकडे उत्सर्जित होणार्‍या सर्वाधिक ऊर्जेचेही हे ठिकाण आहे. तिथे विक्रमी 2177 वॅटस् प्रतिचौरस मीटरची नोंद झालेली आहे. विशेष म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या स्तरात हेच प्रमाण 1360 वॅटस् प्रतिचौरस मीटर इतके असते.

Back to top button