Rare dinosaur skeleton auction | 6 कोटी वर्षांपूर्वीच्या ‘ट्रे’ डायनासोरच्या सांगाड्याचा लिलाव

50 कोटींहून अधिक किंमत मिळण्याची शक्यता
Rare dinosaur skeleton auction |
Rare dinosaur skeleton auction | 6 कोटी वर्षांपूर्वीच्या ‘ट्रे’ डायनासोरच्या सांगाड्याचा लिलाव
Published on
Updated on

सिंगापूर : सुमारे 6 कोटी 60 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या ‘ट्रायसेराटॉप्स’ प्रजातीच्या डायनासोरचा दुर्मीळ सांगाडा, ज्याला ‘ट्रे’ असे नाव देण्यात आले आहे, आता लिलावासाठी सज्ज झाला आहे. अनेक वर्षे अमेरिकेतील संग्रहालयात आकर्षणाचे केंद्र ठरलेला हा जीवाश्म आता खासगी मालकीसाठी ऑनलाईन लिलावात विक्रीला काढला जाणार आहे.

प्रसिद्ध संगीतकार फॅरेल विल्यम्स यांनी सुरू केलेल्या ‘ज्यूपिटर’ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हा लिलाव होणार आहे. 17 मार्च ते 31 मार्च या कालावधीत जगभरातील खरेदीदार यासाठी बोली लावू शकतील. या सांगाड्याची अंदाजित किंमत 4.5 ते 5.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. 17 फूट लांबीचा हा शाकाहारी डायनासोर 1993 मध्ये अमेरिकेतील वायोमिंगमधील लस्क भागात जीवाश्मरूपात सापडला होता. जीवाश्म तज्ज्ञ ली कॅम्पबेल आणि दिवंगत एलन ग्रॅफहॅम यांनी याचा शोध लावला होता.

1995 मध्ये ‘वायोमिंग डायनासोर सेंटर’च्या उद्घाटनापासून हा सांगाडा तिथे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. 2023 पर्यंत तो तिथे भाडेतत्त्वावर होता, त्यानंतर एका खासगी व्यवहारात तो विकला गेला. सध्या हा सांगाडा सिंगापूरमध्ये असून, मार्च अखेरपर्यंत लोक तो खासगीरीत्या पाहू शकतात. अतिश्रीमंत व्यक्ती आणि गुंतवणूकदारांमध्ये आता डायनासोरचे जीवाश्म खरेदी करण्याची क्रेझ वाढली आहे. 2024 मध्ये ‘एपेक्स’ नावाच्या स्टेगोसॉरस सांगाड्याचा 44.6 दशलक्ष डॉलर्समध्ये लिलाव होऊन विक्रम झाला होता.

2020 मध्ये ‘स्टॅन’ नावाच्या टी-रेक्स सांगाड्याची 31.8 दशलक्ष डॉलर्सला विक्री झाली होती. वाढत्या किमतींमुळे शास्त्रज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तज्ज्ञांच्या मते, जर असे दुर्मीळ जीवाश्म श्रीमंतांच्या वैयक्तिक संग्रहात बंद झाले, तर संशोधकांना त्यांचा अभ्यास करण्याची संधी मिळणार नाही. अनेक संग्रहालयांकडे इतकी मोठी बोली लावण्यासाठी पुरेसा निधी नसतो. तरीही, ‘ट्रे’चा नवीन मालक हा सांगाडा पुन्हा एखाद्या संग्रहालयाला अभ्यासासाठी आणि प्रदर्शनासाठी देईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news