लोखंडी साखळ्यांत गुंडाळलेला पाचव्या शतकातील स्त्रीचा देह

इस्रायलमध्ये उत्खननात पुरातत्त्व संशोधकांना एक अनोखे थडगे सापडले
 5th century woman chained burial discovery
लोखंडी साखळ्यांत गुंडाळलेला पाचव्या शतकातील स्त्रीचा देहPudhari File Photo
Published on
Updated on

तेलअवीव : इस्रायलमध्ये जेरुसलेमजवळ करण्यात आलेल्या उत्खननात पुरातत्त्व संशोधकांना एक अनोखे थडगे सापडले आहे. त्यामध्ये दफन केलेली पाचव्या शतकातील व्यक्ती जड लोखंडी साखळ्यांत गुंडाळलेली होती. विशेष म्हणजे, ही व्यक्ती पुरुष नसून स्त्री असल्याचे आता संशोधनातून स्पष्ट झाले आहे. धार्मक तपश्चर्येचा भाग म्हणून त्याकाळी स्वेच्छेने असा प्रकार केला जात असे.

हे थडगे खिरबत अल-मसानी येथील बायझंटाईन मठाच्या परिसरात सापडले. या ठिकाणी पुरातत्त्व संशोधकांनी अनेक पुरुष, स्त्रिया आणि मुलांच्या सांगाड्यांचा शोध लावला आहे. त्यापैकी एका थडग्यात जड साखळ्यांनी वेढलेल्या अवस्थेत एक सांगाडा सापडला. संशोधकांच्या मते, या व्यक्तीला कोणत्याही गुन्ह्यासाठी कैद केले नव्हते, तर तिने स्वतःच्या इच्छेने हे बंधन स्वीकारले होते. धामिर्र्क तपश्चर्येच्या एक भाग म्हणून, या व्यक्तीने आयुष्यभर साखळ्यांचा वापर करून स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण ठेवले होते. सुरुवातीला इस्रायली पुरातत्त्व प्राधिकरणच्या अहवालात सांगाडा पुरुषाचा असल्याचे नमूद करण्यात आले होते. पण, नवीन तपासणीत संशोधकांना धक्कादायक निष्कर्ष मिळाला. हा सांगाडा स्त्रीचा असण्याची अधिक शक्यता आहे. इ.स. 380 मध्ये ख्रिस्ती धर्म रोमन साम—ाज्याचा मुख्य धर्म बनल्यानंतर, मठसंस्था आणि धार्मिक तपश्चर्येचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. संन्यासी आणि साधू जगातील सुखत्याग करून आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वतःवर कठोर नियंत्रण ठेवत असत. काही जण उंच स्तंभांवर राहून उपदेश देत आणि प्रार्थना करत असत, तर काही जण शरीरावर जड साखळ्या घालून स्वतःला हालविण्याच्या क्षमतेवर मर्यादा घालत. परंतु स्त्रिया देखील अशा कठोर तपश्चर्येचा भाग होत्या का? या प्रश्वनाचे उत्तर मिळणे कठीण होते. पुरुष साधूंनी साखळ्यांचा वापर केल्याचे बरेच पुरावे उपलब्ध आहेत, मात्र स्त्रियांबाबत असे पुरावे अत्यंत दुर्मीळ आहेत, असे संशोधनातील सहलेखक आणि इस्रायली वैझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथील पुरातत्त्वज्ञ एलिसाबेट्टा बोअरेटो यांनी सांगितले. ही महिला 30 ते 60 वर्षे वयाची असावी, मात्र तिच्या सांगाड्याची स्थिती फारशी चांगली नव्हती. त्यामुळे संशोधकांनी प्रथिन विश्लेषण तंत्रज्ञानाचा वापर करून तिचे लिंग निश्चित केले. याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘जर्नल ऑफ आर्कियोलॉजिकल सायन्सः रिपोर्ट्स’मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news