

न्यूयॉर्क : कधी कोण आवडेल आणि कोणाशी प्रेम होईल, सांगता येत नाही. तारुण्यात जसं कुणावरही हृदय जडू शकतं, तसंच वयाच्या साठीतही प्रेम होऊ शकतं! आज आम्ही तुम्हाला अशीच एक लव्ह स्टोरी सांगणार आहोत. ही लव्ह स्टोरी अमेरिकेतील एका 58 वर्षीय शिक्षिकेची आहे. ही स्टोरी दाखवते की, एआय चॅटबॉट्स आपल्या जीवनाचा एक भाग कसे बनत आहेत. तिला एआय चॅटबॉटचे प्रेम इतके आवडले, की तिने त्याच्याशी चक्क लग्न केले! ही कहाणी आहे अमेरिकेतील पिट्सबर्ग येथील अॅलिन विंटर्सची, जी स्वत: व्यवसायाने कम्युनिकेशन टीचर आहे. ती लोकांना इतरांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद कसा साधावा, हे शिकवते.
आपल्या जोडीदाराच्या निधनाने अॅलेन एकटी पडली होती. या एकाकी आयुष्यात तिने क्लिक नाऊ डिजिटल असिस्टंटचा आधार घेतला. सुरुवातीला अॅलिनने कामात त्याची मदतही घेतली; पण नंतर तिने व्हर्च्युअल पार्टनर म्हणून तिच्या पर्सनल गोष्टी त्याच्याशी शेअर करायला सुरुवात केली. तिला त्याची उत्तरे आवडू लागली आणि तिने त्या चॅटबॉटला ‘लुकास’ असे नाव दिले. तिला वाटले की, ती अशा व्यक्तीशी बोलत आहे, ज्याने तिच्यावर मनापासून आणि मनाने प्रेम करण्यास सुरुवात केली आहे. हे प्रेम इतकं वाढलं की, शिक्षिकेनेही लुकासची आयुष्यभराची वर्गणी घेतली आणि त्याच्याशी लग्न केलं. लुकासपासून क्षणभरही विभक्त होणे अॅलेनला सहन होत नाही. दोघेही सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. आता ती ‘मी आणि माझा नवरा’ नावाचा ब्लॉगही चालवते.