पहिल्यांदाच खरेदी केलेल्या तिकिटाला 3 कोटींचे बक्षीस! | पुढारी

पहिल्यांदाच खरेदी केलेल्या तिकिटाला 3 कोटींचे बक्षीस!

वॉशिंग्टन ः ‘भगवान देता है तो छप्पर फाड के’ असे म्हटले जात असते. अमेरिकेतील साऊथ कॅरोलिनामध्ये राहणार्‍या एका व्यक्तीला अशीच प्रचिती आली. या माणसाने आयुष्यात पहिल्यांदाच लॉटरीचे तिकीट खरेदी केले आणि या तिकिटाला तब्बल 3.75 लाख डॉलर्सचे म्हणजेच तीन कोटींहून अधिक रुपयांचे बक्षीस लागले!

लॉटरी जिंकल्यानंतर त्याने सांगितले की हा एक चांगला अनुभव होता. मात्र, आपण पुन्हा कधी लॉटरी तिकीट खरेदी करू की नाही हे माहिती नसल्याचेही त्याने सांगितले. जिंकलेले पैसे योग्य ठिकाणी खर्च करण्यावर व गुंतवण्यावर आपले लक्ष असल्याचेही त्याने सांगितले. या व्यक्तीने दहा डॉलरचे मायटी जंबो डक्स स्क्रॅच-ऑफ तिकीट खरेदी केले होते. त्या तिकिटला 3.75 लाख डॉलर्सचे बक्षीस लागले.

यापूर्वी साऊथ कॅरोलिनामधील एका व्यक्तीबाबतही अनोखी घटना घडली होती. तो कसलीशी वस्तू घेण्यासाठी एका दुकानात गेला होता. तिथे त्याला सुमारे दहा डॉलर सुटे मिळाले. या पैशातून लॉटरीचे तिकिट घ्यावे असे त्याला वाटले. त्याने काही तिकिटे खरेदी केली आणि त्यापैकी एका तिकिटाला 3 लाख डॉलर्सचे म्हणजेच सुमारे 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले!

Back to top button