‘स्टारशिप’च्या आणखी एका चाचणीची तयारी

‘स्टारशिप’च्या आणखी एका चाचणीची तयारी
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः 'स्पेस एक्स' कंपनीने 'स्टारशिप'च्या आणखी एका चाचणीची तयारी केली आहे. यावेळी ते सुपर हेवी व्हेईकल बूस्टर 9 आणि शिप 25 अंतराळात पाठवणार आहेत. 'स्पेस एक्स'चे स्टारशिप स्पेसक्राफ्ट आणि सुपर हेवी रॉकेट यांना एकत्रितपणे 'स्टारशिप' म्हणतात. ही एक पुन्हा वापरता येण्याजोगी वाहतूक व्यवस्था आहे. यात प्रगत रॅप्टर इंजिन आहेत. 'स्पेस एक्स'ने व्हिडीओ जारी करून ही माहिती दिली आहे.

18 मे रोजी कंपनीने 'शिप 25' ला दक्षिण टेक्सासमधील स्टारबेस साईटवर सबॉर्बिटल पॅडवर हलवले. दुसर्‍या दिवशी म्हणजे 19 मे रोजी वॉटर-कूल्ड स्टील प्लेटवर त्याच्या 6 रॅप्टर इंजिनची स्थिर अग्नी चाचणी घेण्यात आली. स्टॅटिक फायर ही एक सामान्य प्रीफ्लाईट चाचणी आहे ज्यामध्ये वाहनाचे इंजिन थोड्या वेळासाठी सुरू केले जाते. लाँचच्या अपडेटबद्दल माहिती देताना एलन मस्क म्हणाले की, 'मुख्य लाँचपॅड अपग्रेड सुमारे एका महिन्यात पूर्ण केले जाईल. मग पॅडवर रॉकेट चाचणीचा आणखी एक महिना, नंतर स्टारशिपची दुसरी फ्लाईट. म्हणजेच जुलै-ऑगस्टमध्ये स्टारशिप पुन्हा उड्डाण करू शकते.

यापूर्वी 20 एप्रिल रोजी स्टारशिपची पहिली परिभ-मण चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत बूस्टर 7 आणि शिप 24 लाँच करण्यात आले होते. तथापि, स्टारशिप लिफ्ट-ऑफच्या 4 मिनिटांनंतर, मेक्सिकोच्या आखातापासून सुमारे 30 किलोमीटरवर त्याचा स्फोट झाला. स्टारशिपच्या अपयशानंतरही एलन मस्क आणि कर्मचारी स्पेस एक्सच्या मुख्यालयात आनंदोत्सव साजरा करत होते. याचे कारण असे की जेव्हा रॉकेटने लाँचपॅडवरून उड्डाण केले तेव्हा त्याला मोठे यश मिळाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news