मजबूत ‘डीएनए’च्या लोकांमध्ये लवकर बनतात सिक्स पॅक

मजबूत ‘डीएनए’च्या लोकांमध्ये लवकर बनतात सिक्स पॅक

लंडन : सध्याच्या काळात व्यायामाचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे तरुणाईची पावले जीमकडे वळत आहेत. तंदुरुस्तीसाठी व्यायाम महत्त्वाचा आहेच, शिवाय आपले शरीर पिळदार, कसलेले दिसावे अशीही तरुणांची इच्छा असते. 'सिक्स पॅक'ची संकल्पना आपल्याकडे बॉलीवूडने चांगलीच रुजवलेली आहे. मात्र, सर्वांनाच ते सहज शक्य होते असे नाही. कुणाला काही महिन्यांमध्येच हे साध्य होते तर काहींना बराच काळ लागतो. याचे कारण आता वैज्ञानिकांनी सांगितले आहे. ज्या लोकांचे 'डीएनए' मजबूत असतात त्यांच्यामध्ये सिक्स पॅक लवकर बनतात असे त्यांचे म्हणणे आहे.

सिक्स पॅकमागेही मानवी जनुकांचा संबंध आहे. कमजोर डीएनए असलेल्या लोकांना बराच व्यायाम करूनही त्याचा परिणाम उशिरा दिसतो. मात्र, स्ट्राँग डीएनए असलेल्या लोकांमध्ये तो लवकर दिसतो. माणसाच्या एक्सरसाईज ट्रेनिंगवर जनुकांचा कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी केम्बि—जच्या एंग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी जुन्या 24 संशोधनांचा अभ्यास व पडताळणी केली. या विश्लेषणातून दिसून आले की माणसात असे तेरा जीन्स असतात ज्यांचा संबंध व्यायामाशी असतो.

व्यायामाचा शरीरावरील परिणाम चांगल्या प्रकारे दिसून येण्यासाठी ही जनुके मजबूत असणे गरजेचे असते. या जनुकांचा संबंध कार्डियो फिटनेस, मसल स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि एनएरोबिक एक्सरसाईजवर पडतो. मानवी शरीरावर व्यायामचा चांगला परिणाम दिसण्यासाठी तेरा जनुके जबाबदार असतात. व्यायामाचा परिणाम दिसण्यासाठी 72 टक्क्यांपर्यंत ही जनुके जबाबदार ठरतात. अर्थात आहार आणि पोषक घटकही यामागे कारणीभूत असतात हे नाकारता येत नाही. 15 ते 55 वर्षे वयोगटातील 3,012 लोकांची याबाबत पाहणी करण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news