तुर्कीमध्ये 1800 वर्षांपूर्वीच्या मकबर्‍यांचा शोध

तुर्कीमध्ये 1800 वर्षांपूर्वीच्या मकबर्‍यांचा शोध

इस्तंबुल : तुर्कीच्या पुरातत्त्व संशोधकांनी दगड कोरून बनवलेल्या 1800 वर्षांपूर्वीच्या सुंदर मकबर्‍यांचा शोध लावला आहे. या मकबर्‍यांच्या छत व भिंतींवर अतिशय सुंदर पेंटिंग केलेली आहे. या पेंटिंगमधील वेलबुट्टीतील रंग अजूनही टवटवीत आहेत हे विशेष!
तुर्कीच्या यूसाक युनिव्हर्सिटीतील पुरातत्त्व संशोधक बिरोल कॅन यांच्या टीमने सुंदर वॉल पेंटिंग्ज असलेले तब्बल 400 मकबर्‍यांचा शोध  लावला.

या मकबर्‍यांमध्ये काही बहुमूल्य वस्तूही सापडल्या आहेत. रोमन साम—ाज्याच्या काळात दगड कोरून हे मकबरे बनवण्यात आले होते. ब्लॉनडोस या ऐतिहासिक शहरात हे मकबरे सापडले असून त्या काळातील अनेक वस्तूही सापडल्या आहेत. हे शहर 'जगज्जेता' सिकंदर म्हणजेच अलेक्झांडरच्या काळात वसवण्यात आले होते. रोमन आणि बायझेंटाईन साम—ाज्याच्या काळात ते वैभवाच्या शिखरावर होते. या काळात गुहांमध्ये दगडातील थडग्यांमध्ये मृतदेह ठेवले जात असत. ब्लॉनडोसमधील या मकबर्‍यांची जागा श्रीमंत कुटुंबांच्या मालकीची होती. अशा कुटुंबांमधील एखाद्या व्यक्तीचे निधन झाले की त्याला या मकबर्‍यात दफन केले जात होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news