चीनमध्ये सापडली पाच हजार वर्षांपूर्वीची जेडची कलाकृती

एका गोलाकार थडग्यामध्ये ही कलाकृती सापडली
5000 year old dragon artwork made of jade found in china tomb
चीनमध्ये पाच हजार वर्षांपूर्वीच्या एका थडग्यात जेडपासून बनवलेली ड्रॅगनची कलाकृती सापडली.Pudhari File Photo
Published on
Updated on

बीजिंग : चीनमध्ये पाच हजार वर्षांपूर्वीच्या एका थडग्यात जेडपासून बनवलेली ड्रॅगनची कलाकृती सापडली आहे. ही कलाकृती 6.2 इंच लांब व 3.7 इंच रुंदीची आहे. एका गोलाकार थडग्यामध्ये ही कलाकृती सापडली. या थडग्यात मानवी अवशेषही सापडले आहेत. तसेच मातीची अनेक भांडीही याठिकाणी आढळून आली.

चीनच्या इनर मंगोलिया ऑटोनोमस रिजनमधील चिफेंग शहरात करण्यात आलेल्या उत्खननात हे थडगे आढळले. ते 5 हजार ते 5100 वर्षांपूर्वीच्या काळातील आहे. त्यावेळी या परिसरात होंगशान संस्कृती फुलली होती. या संस्कृतीमधील लोक शेती करीत, उंच इमारती असलेली शहरे बनवत आणि सुंदर कलाकृतीही तयार करीत. होंगशान संस्कृतीमधील लोकांनी जेडपासून बनवलेल्या ड्रॅगन कलाकृतींचा एक सुंदर नमुना आता उत्खननात सापडलेला आहे. अर्थात हे संशोधन जरी महत्त्वाचे असले तरी नवे नाही, असे जेरुसलेममधील द हिब्रु युनिव्हर्सिटीच्या ईस्ट एशियन स्टडीजचे प्राध्यापक गिडियन शेलाच-लावी यांनी म्हटले आहे. यापूर्वीही होंगशान संस्कृतीमधील थडग्यांमध्ये अशीच जेड ड्रॅगन कलाकृती सापडलेल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news