...तर ‘ट्विटर’वरील ब्ल्यू टिक जाणार! | पुढारी

...तर ‘ट्विटर’वरील ब्ल्यू टिक जाणार!

वॉशिंग्टन ः ‘ट्विटर’ची मालकी मिळाल्यानंतर एलन मस्क सतत चर्चेत आहेत. ट्विटरमधील मोठ्या अधिकार्‍यांना घरचा रस्ता दाखवणार्‍या एलन मस्क यांनी मोठ्या मोठ्या निर्णयाचा धडाका लावला आहे. ट्विटरचे ब्ल्यू टिक व्हेरिफिकेशनसाठी पैसे मोजावे लागत असल्याने सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे. यापूर्वी काही ठराविक लोकांनाच ब्ल्यू टिक दिली जायची, मात्र आता पैसे देऊन कोणालाही ब्लू टिकसाठी सबस्क्रिप्शन मिळू शकतं. 1 एप्रिलपासून ट्विटरकडून हे नवीन नियम लागू करण्यात येतील. भारतात ट्विटरच्या ब्ल्यू टिकसाठी 900 रुपये प्रतिमहिना शुल्क आहे.

मस्क यांनी ट्विटर व्हेरिफिकेशन बंद करून ट्विटर सबस्क्रिप्शन सेवा नव्या अटींसह सुरू केली आहे. या नियानुसार तुम्ही ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन घेतले नसेल आणि पूर्वीच तुमच्या अकाऊंटला ब्लू टिक आहे अशा यूजर्सनी प्रोफाईल नाव किंवा फोटो बदलल्यास त्यांचे ब्ल्यू टिक जाऊ शकते. ट्विटरवर ज्यांच्या अकाऊंटला पूर्वीच ब्ल्यू टिक आहे, आणि त्यांनी ट्विटरवर ब्ल्यू टिकसाठी सबस्क्रिप्शन घेतलं नाहीये, अशा ट्विटर वापरकर्त्यांनी व्हेरिफाईड अकाऊंटवर पैसे न भरल्यास त्यांना ब्ल्यू टिक गमवावी लागणार असल्याचा इशारा एलन मस्क यांनी दिला आहे.

यामध्ये पत्रकार, सेलिबि—टी, राजकारणी, ज्यांनी ब्ल्यू टिकसाठी पैसे दिले नाहीत अशा सगळ्यांच्या अकाऊंटस्ची ब्ल्यूू टिक जाऊ शकते. तुम्ही तुमच्या ट्विटर अकाऊंटचे ब्ल्यू टिक सबस्क्रिप्शन घ्याल तेव्हा, ट्विट एडिट करणे, जास्त मिनिटांचे व्हिडीओ अपलोड करता येणार आहेत. रिडर मोड आणि ब्ल्यू टिक या सेवा तुम्हाला मिळणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. ब्लू टिक सबस्क्रिप्शनसाठी तुमचे अकाऊंट हे 90 दिवस जुने असणे आणि व्हेरिफाईड फोन नंबर असणे आवश्यक आहे. तसेच ब्ल्यूू टिक सबस्क्रिप्शन असलेल्या अकाऊंटवरील जाहिरातींची संख्याही कमी असेल असे मस्क यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button