सोने, प्लॅटिनमजडीत नौका | पुढारी

सोने, प्लॅटिनमजडीत नौका

न्यूयॉर्क ः जगभरातील अनेक धनकुबेरांकडे महागड्या यॉटस् म्हणजेच नौका आहेत. अशा शाही थाटाच्या नौकांमध्ये सर्व प्रकारच्या सुखसुविधा असतात आणि हे श्रीमंत लोक त्यामधून नौकानयनाचा आनंद लुटत आपली सुट्टी ‘एन्जॉय’ करतात. मात्र, अशा अद्ययावत नौकांमध्येही अनेक नौका अत्यंत महागड्या व प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एक नौका तर सोने व प्लॅटिनमसारख्या मौल्यवान धातूंनी सजवलेली आहे.

या यॉटची निर्मिती करण्यासाठी सोने आणि प्लॅटिनमचा वापर करण्यात आला आहे. यात डायनासोरचा एक पुतळा आहे. या डायनासोरच्या पाठीचे हाड आणि यॉटमधील वाईनचे ग्लास 18 कॅरेट हिर्‍यांनी बनविण्यात आले आहेत. या यॉटची किंमत 28800 कोटी रुपये आहे. जगातील काही श्रीमंतच ही यॉट भाड्याने घेऊ शकतात. केवळ तिला प्रत्यक्षात बघण्यासाठी काही लोक लाखो रुपये चुकवतात. ही यॉट बनविण्याकरिता तब्बल तीन वर्षे वेळ लागला आहे. संपूर्ण काम याचे हाताने केले आहे.ज्वेलर स्टुअर्ट ह्युजेस यांनी ही यॉट डिझाईन केलेली आहे.

Back to top button