समुद्राच्या पाण्याखाली पूल बनतो बोगदा! | पुढारी

समुद्राच्या पाण्याखाली पूल बनतो बोगदा!

कोपेनहेगन ः डेन्मार्कच्या झियालँड या बेटाला स्विडनच्या दक्षिणेकडील प्रांत स्कॅनियापासून ओरेसुंड सामुद्रधुनी वेगळे करते. या सामुद्रधुनीची सर्वात कमी रुंदी ही 4 किलोमीटरची आहे. मात्र, तरीही अंतर राहत असल्याने ते मिटवण्यासाठी एक भुयारी पूल तयार करण्यात आला. हा पूल समुद्राच्या पाण्याखालून जातो! या बोगद्याचे नाव आहे ‘ड्रॉगडेन टनेल’.

या पुलाचे डिझाईन डॅनिश इंजिनिअरिंग फर्म ‘कोवी’ने बनवले असून मुख्य आर्किटेक्ट जॉर्ज के.एस. रोट्ने हे आहेत. दोन्ही देशांकडून हा पूल वापरला जात आहे. स्विडिश किनारपट्टीवरील पेबरहोम या कृत्रिम बेटापासून तो आठ किलोमीटर अंतरापर्यंत आहे. सामुद्रधुनीचे चार किलोमीटरचे अंतर या पाण्याखालील बोगद्यातून पार केले जाते. हा बोगदा पेबरहोमपासून डॅनिश बेट अ‍ॅमागरपर्यंत आहे. हा पूल व बोगदा रोड आणि रेल ब—ीज अशा दोन्ही स्वरूपाचा आहे. अशा पद्धतीचा हा युरोपमधील सर्वात मोठा पूल आहे. या केबल ब—ीजला 204 मीटर उंचीच्या पायलॉनचा (केबलसाठीचे मनोरे) आधार आहे.

Back to top button