जगातील सर्वात महागड्या भाजीत ‘हे’ औषधी गुण! | पुढारी

जगातील सर्वात महागड्या भाजीत ‘हे’ औषधी गुण!

लंडन ः ‘जगातील सर्वात महागडी भाजी’ म्हणून ‘हॉप शूट’ची ओळख आहे. ही एक अशी वनस्पती आहे, जी तिच्या विशिष्ट सुगंध आणि आंबट चवीसाठी ओळखली जाते. तसेच हॉपच्या फुलांचा वापर बिअरमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. ही भाजी जगाच्या अनेक भागांमध्ये पिकवली जाते; परंतु युरोपियन देशांमध्ये तिला विशेष मागणी आहे. या भाजीची किंमत 85,000 रुपये प्रतिकिलो असल्याने तिला ‘जगातील सर्वात महाग भाजी’ म्हटले जाते.

तज्ज्ञांच्या मते, हॉप्स अँटिऑक्सिडंटस्चा चांगला स्रोत आहेत. जे शरीराला मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. त्यामुळे त्वचा चिरंतर तरुण राहते. त्याचे साथीदार हॉप्स वनस्पतीमध्ये दाहक-विरोधी असतात, जे त्वचेतील जळजळ दूर करण्याचे काम करतात. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, हॉपचा उपयोग चिंता आणि निद्रानाशासाठी औषध म्हणून केला जातो.

हॉप्सच्या अँटिबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे त्याचा अल्सर बरा करण्यासाठी वापरला जातो. औषधी वनस्पतींसह हॉप सप्लिमेंटस् अल्सर निर्माण करणारे बॅक्टेरिया काढून टाकण्याचे काम करतात. त्यामुळे अल्सरवर ही भाजी अतिशय फायदेशीर आहे. हॉप ऑईल वेदनाशामक म्हणून काम करते. हृदयविकारावरही हॉप्स गुणकारी ठरू शकतात.

Back to top button