3700 Year Old Olive Tree | तब्बल ३,७०० वर्षे जुने ‘ऑलिव्ह’चे झाड अजूनही देतेय फळे

3700 Year Old Olive Tree |
3700 Year Old Olive Tree | तब्बल ३,७०० वर्षे जुने ‘ऑलिव्ह’चे झाड अजूनही देतेय फळे
Published on
Updated on

अल्ब्रांतेस (पोर्तुगाल) : मानवी संस्कृतीचा इतिहास, अनेक साम्राज्यांचा उदय आणि अस्त अनुभवणारे एक झाड आजही फळे देत आहे, यावर विश्वास बसणे कठीण आहे. मात्र, पोर्तुगालमधील एका प्राचीन ऑलिव्हच्या झाडाने हे करून दाखवले आहे. तब्बल ३,७०० वर्षे जुने असलेले हे झाड आजही पूर्वीसारखेच ताजेतवाने असून दरवर्षी ऑलिव्हची फळे देत आहे.

हे अद्‌भुत झाड पोर्तुगालमधील अल्ब्रांतेस या भागात असून ते जगातील सर्वात जुन्या जिवंत वनस्पतींपैकी एक मानले जाते. युनिव्हर्सिटी ऑफ त्रासोस-ऑस-माँटेस अँड अल्तो डोरोमधील संशोधकांनी एका विशेष शास्त्रीय पद्धतीचा (Dendrochronology आणि Tree-ring analysis) वापर करून या झाडाचे वय निश्चित केले आहे. या संशोधनानुसार, या झाडाची लागवड इसवी सन पूर्व १७०० च्या सुमारास झाली असावी. याचा अर्थ, कांस्ययुगात रुजलेले हे झाड आजच्या आधुनिक युगातही टिकून आहे.

या झाडाची वैशिष्ट्ये : रोमन साम्राज्य, मध्ययुगीन काळ आणि अनेक जागतिक घडामोडींचा हे झाड मूक साक्षीदार आहे. ३,७०० वर्षे उलटूनही या झाडाची फळ देण्याची क्षमता संपलेली नाही. आजही स्थानिक लोक याच्या ऑलिव्हचा वापर करतात. पोर्तुगाल सरकारने या झाडाला ‘राष्ट्रीय सार्वजनिक हित’ (National Public Interest) म्हणून घोषित केले असून याच्या संरक्षणासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. हे झाड पाहण्यासाठी आणि त्याचा प्राचीन इतिहास अनुभवण्यासाठी जगभरातून वनस्पतिशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि पर्यटक येथे भेट देत आहेत. निसर्गाची सहनशक्ती आणि पुनरुत्पादन क्षमतेचे हे एक उत्तम उदाहरण मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news