मगरीला मांडीवर घेऊन खेळवणारा माणूस! | पुढारी

मगरीला मांडीवर घेऊन खेळवणारा माणूस!

लंडन ः ‘क्रोकोडाईल हंटर’ या शोमधील स्टीव्ह आयर्विन मगरींना किती धाडसाने हाताळत होता हे अनेकांनी पाहिले असेल. दुर्दैवाने हा धाडसी वन्यजीव कार्यकर्ता समुद्रात स्टींग रेच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला. स्टीव्हसारखे अन्यही अनेक लोक या जगात आहेत. एक माणूस तर असा आहे जो मगरींना चक्क पाळीव कुत्र्या-मांजरासारखे वागवतो. एका मगरीला मांडीवर घेऊन तिला गोंजारत माहिती देत असलेल्या या माणसाचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

मगरीचा जबडा आणि ‘काळाचा जबडा’ हे समानार्थीच शब्द असावेत असे वाटण्यासारखी स्थिती असते. मगरीच्या अशा घातक जबड्यापासून कुणीही दूरच राहील. मात्र, हा माणूस मगरीला लाडकी मनीमाऊ असल्यासारखे जवळ घेतो. या व्हिडीओत दिसते की एक मगर शांतपणे पहुडलेली आहे आणि हा माणूस जवळ येताच ती जबडा उघडून त्याच्याकडे पाहू लागते. तो तिला कुरवाळतो, ओढून जवळ घेतो आणि मांडीवर बसवतो. ही मगरही त्याला कोणतीही इजा पोहोचवत नाही हे विशेष. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आणि त्याला लाखो व्ह्यूज मिळाले.

Back to top button