‘इथे’ सूर्य मावळतच नाही! कुठे आहे हे ठिकाण? | पुढारी

‘इथे’ सूर्य मावळतच नाही! कुठे आहे हे ठिकाण?

लंडन ः एकेकाळी ब्रिटीश साम्रज्यावरचा सूर्य मावळत नव्हता असे म्हटले जाते. याचा अर्थ इतकाच की संपूर्ण जगभर ब्रिटिशांनी आपल्या वसाहती करून ठेवल्या होत्या. मात्र, जगाच्या पाठीवर काही देश असे आहेत जिथे उन्हाळ्यात खरोखरच सूर्य कधी मावळतच नाही. घड्याळातील वेळेनुसार मध्यरात्र असली तरीही तिथे क्षितिजावर सूर्य दिसतच असतो. त्याला ‘मिडनाईट सन’ असे म्हटले जाते. हा नजारा पाहण्यासाठी अनेक लोक अशा ठिकाणी जात असतात.

नॉर्वे, फिनलँड, स्विडन, अमेरिकेतील अलास्का, कॅनडा, आईसलँडमध्ये उन्हाळ्यात सूर्य असा अहोरात्र तळपतच असतो. नॉर्वे देशाला तर ‘मिडनाईट सन’चा देश म्हणूनच ओळखले जाते. या देशात मेच्या उत्तरार्धापासून ते जुलैच्या उत्तरार्धापर्यंत म्हणजे सुमारे 76 दिवसांच्या कालावधीत सूर्य चोवीस तासांपैकी वीस तास तळपतच असतो. ध्रुव्रीय प्रदेशालगतच्या देशांमध्ये असे प्रकार पाहायला मिळत असतात. हिवाळ्यात तिथे अनेक दिवस सूर्यदर्शनही होत नाही. फिनलँडमध्ये हिवाळ्यात अशी दिवसाचीही रात्र झाल्याचे पाहायला मिळते. स्विडनमध्ये निरंतर सूर्यप्रकाशाचा कालावधी वर्षाकाठी सहा महिन्यांपर्यंत असतो. अलास्कामध्ये मे अखेरीस ते जुलैच्या उत्तरार्धापर्यंत सूर्य मावळत नाही. कॅनडात इनुविक व वायव्येकडील भागात सुमारे 50 दिवस सूर्य मावळत नाही.

Back to top button