‘हे’ माहीत आहे का? | पुढारी

‘हे’ माहीत आहे का?

  • हरभर्‍यामध्ये लोह आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत होते व अशक्तपणाही दूर होतो.
  • हरभर्‍यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे नियमितपणे भिजवलेले हरभरे खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
  • रिकाम्या पोटी हरभरे खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
  • काळ्या हरभर्‍यांमध्ये मँगेनीज, थायामिन, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस ही पोषक तत्त्वे असतात.
  • ‘द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार 200 ग्रॅम हरभरा खाणार्‍यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.
  • दररोज हरभरा खाल्ल्याने लठ्ठपणाचा धोका 53 टक्क्यांनी कमी होतो.
  • मानसिक तणावाच्या काळात तसेच काविळीच्या समस्येतही हरभर्‍याचे सेवन गुणकारी ठरू शकते.
  • हरभर्‍यांच्या सेवनाने पुरुषांमध्ये शुक्राणूंचे प्रमाण वाढते.

Back to top button