पृथ्वीवर ‘ब्लॅकहोल’चा परिणाम होऊ शकेल का?

पृथ्वी
पृथ्वी

न्यूयॉर्क : 'ब्लॅकहोल' हे ब्रह्मांडातील सर्वाधिक रहस्यमयी खगोलीय पिंडांपैकी एक आहे. यासंदर्भात सुरुवातीपासूनच भरपूर सांगण्यात आले. ब्लॅकहोलमध्ये प्रकाशासह सर्वकाही आपल्या आत खेचून घेण्याची क्षमता असते. खगोलशास्त्रज्ञांनी अनेकवेळा अशी ठिकाणे पाहिली की, तेथील तारे आणि अन्य खगोलीय पदार्थ ब्लॅकहोलच्या दिशेने प्रचंड वेगाने खेचले जात आहेत. मात्र, अशा एखाद्या ब्लॅकहोलचा पृथ्वीवर काही परिणाम होईल का? याबाबत विज्ञान काय सांगते, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्लॅकहोलची शक्‍ती त्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणात सामावलेली असते. यामध्ये प्रकाशासह अन्य खगोलीय वस्तूही आपल्याकडे खेचण्याची क्षमता असते. या गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्याजवळ जाणार्‍या सर्व खगोलीय वस्तू ब्लॅकहोलमध्ये खेचल्या जातात. एकदा का या वस्तू आत खेचल्या की, त्या बाहेर पडणे अशक्यप्राय असते. या घटनेस 'इव्हेंट होराईझन' असेही म्हटले जाते. ब्लॅकहोल अत्यंत घातक होण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्याची 'स्पेगटिफिकेशन' प्रक्रिया. यामध्ये एखादी खगोलीय वस्तू ब्लॅकहोलच्या कक्षेत पोहोचली की, ती पीठ अथवा शेवयांप्रमाणे विखरू आणि तुटू लागते. त्यानंतर सर्वकाही ब्लॅकहोलमध्ये सामावून जाते. मोठमोठ्या तार्‍यांच्या बाबतीतही असेच होत असते.

वरील प्रक्रिया पृथ्वीबाबतही घडू शकतील का? या प्रश्‍नाचे उत्तर देताना ब्लॅकहोल आणि पृथ्वी यांमधील अंतर प्रथम पाहावे लागेल. कारण, सध्या जे ब्लॅकहोल जवळ आहे ते पृथ्वीपासून प्रदीर्घ अंतरावर आहे. याचे नाव 'व्ही 616 मोनोसेरोटिस' असे आहे. या ब्लॅकहोलचे भारमान पृथ्वीपेक्षा 6.6 पटीने जास्त आहे. जर आपली पृथ्वी या ब्लॅकहोलच्या आठ लाख किलोमीटरच्या कक्षेत गेली की, पृथ्वीचे काहीच खरे नाही. मात्र, सध्या पृथ्वीवर जे लोक आहेत, त्यांच्या पूर्ण हयातीत तरी अशी घटना घडणार नाही. शिवाय 'व्ही 616 मोनोसेरोटिस' हे ब्लॅकहोल पृथ्वीपासून तब्बल 3300 प्रकाशवर्षे दूर आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news