‘तिने’ स्वतःच काढले आपले तेरा दात! | पुढारी

‘तिने’ स्वतःच काढले आपले तेरा दात!

लंडन ः ब्रिटनमध्ये सध्या ‘डेंटल इमर्जन्सी’सारखी स्थिती बनलेली आहे. डेंटिस्टची कमतरता असल्याने अनेक लोक स्वतःच आपले दुखरे दात काढून टाकण्यास बाध्य होत आहेत. जे डेंटिस्टकडून उपचाराची वाट पाहत राहिले त्यांना इमर्जन्सीने हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले आहे. हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावरही त्यांना डेंटिस्टकडून उपचार मिळू शकत नाही अशी स्थिती आहे. अशा स्थितीत एका महिलेने तर वैतागून स्वतःच आपले तेरा दात काढून टाकले!

सरकारी रुग्णालयांमध्ये सध्या डेंटिस्टची मोठीच उणीव भासत आहेत. अनेक रुग्णांना उपचाराशिवायच परत पाठवले जात आहे. जे डेंटिस्ट उपलब्ध आहेत त्यांनी सांगितले की कोरोना काळात वेतनात घट करण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षभरातच सुमारे दोन हजार डेंटिस्ट काम सोडून निघून गेले. गेल्या दशकभराच्या काळापासून सरकारकडून वित्तीय सहयोग कमी मिळत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये नवे डेंटिस्ट कमीच आहेत. आता सरकारी आरोग्य विभागाने तीन लाखांपेक्षा अधिक डेंटिस्ट नियुक्तीसाठी 400 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. सरकारी हॉस्पिटल्समध्ये एक लाख रुग्णांच्या उपचारासाठी केवळ 32 डेंटिस्टच आहेत. दातदुखीमुळे त्रस्त 30 लाखांपेक्षा अधिक लोकांना 64 किलोमीटर फिरूनही उपचाराची सुविधा मिळत नाही अशी स्थिती आहे!

Back to top button