Delhi Dussehra | दिल्लीतील द्वारका येथे उभारला तब्बल २२१ फूट उंच रावण

३८ लाख खर्च अन् ३ महिन्यांची मेहनत; यंदाचा पुतळा पूर्णपणे ‘वॉटरप्रूफ’!
Delhi Dussehra |
Delhi Dussehra | दिल्लीतील द्वारका येथे उभारला तब्बल २२१ फूट उंच रावण
Published on: 
Updated on: 

नवी दिल्लीः दसऱ्याच्या दिवशी विशेषतः उत्तर भारतात अनेक ठिकाणी रावण दहन केले जाते. रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांचे फटाके भरलेले भव्य पुतळे उभे करून ते विजयादशमीला जाळले जातात. सध्याच्या काळात रावणाचे पुतळे अधिक आकर्षक आणि हटके बनवण्याची स्पर्धाच लागल्याचे पाहायला मिळते. कुठे सर्वात उंच, कुठे सर्वात महाग, तर कुठे तंत्रज्ञानाचा वापर करून विशेष पुतळे तयार केले जात आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतही यंदा असाच एक अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. दिल्लीतील द्वारका सेक्टर १० मधील दसरा मेळाव्यात यंदा देशातील सर्वात उंच रावणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.

या रावणाची उंची तब्बल २२१ फूट इतकी आहे. जमिनीवरून वर पाहिल्यास एकाच नजरेत संपूर्ण पुतळा दिसणेही कठीण जाते. हा प्रचंड पुतळा तयार करण्यासाठी तब्बल ३ महिन्यांहून अधिक काळ लागला आहे. यासाठी १ हजारहून अधिक बांबू आणि सुमारे ६० टन लोखंडाचा वापर करण्यात आला आहे. अनेकदा दसऱ्याच्या दिवशी अचानक आलेल्या पावसामुळे रावणाचे पुतळे भिजून नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन यंदाचा हा रावण पूर्णपणे ‘वॉटरप्रूफ’ (जलरोधक) बनवण्यात आला आहे.

या संपूर्ण पुतळ्याच्या निर्मितीसाठी ३८ लाख रुपयांहून अधिक खर्च आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या पुतळ्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही युजर्सच्या मते हा पुतळा कोटा (राजस्थान) येथील रावणाच्या पुतळ्याची नक्कल आहे, तर काहींच्या मते या पुतळ्याचा खरा खर्च ३८ लाख नसून ४५ लाख रुपये असावा. एका युजरने उपरोधिक टिपणी करत लिहिले आहे की, ‘हा पुतळा वॉटरप्रूफ नक्कीच आहे; पण गारांच्या पावसापासून वाचू शकेल का?’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news