कोरोना रुग्णावर प्रथमच ‘डबल लंग ट्रान्सप्लांट’

शिकागो :

डबल लंग ट्रान्सप्लांट म्हणजेच फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अशा व्यक्‍तींवर केली जाते ज्यांची फुफ्फुसे जवळजवळ पूर्णपणे खराब झालेले आहेत. या प्रत्यारोपणासाठी रुग्णाला गंभीर शस्त्रक्रियेचा सामना करावा लागतो. याशिवाय शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सामान्य जीवन जगण्यासाठी प्रबळ इच्छाशक्‍ती असावी लागते. आता शिकागोमधील 28 वर्षांच्या मायरा रामिरेज या युवतीवर 'कोविड-19' मुळे अशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. एखाद्या कोरोना रुग्णावर अशी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होण्याचे हे पहिलेच उदाहरण असून एका भारतीय वंशाच्या डॉक्टरांनीच ही शस्त्रक्रिया केली आहे.

शिकागोच्या नॉर्थवेस्टर्न मेमोरियल हॉस्पिटलमध्ये मायरावर ही शस्त्रक्रिया झाली. गेल्या बुधवारीच तिला घरी सोडण्यात आले आणि आता ती घरातून ऑफिसचे कामही करू लागली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे तिची फुफ्फुसे क्षतिग्रस्त झाली होती. त्यामुळे तिला वाचवण्याचा केवळ एकच उपाय होता व तो म्हणजे फुफ्फुसांचे प्रत्यारोपण. डॉ. अंकित भरत यांनी तिच्यावर अशी शस्त्रक्रिया केली. लंग ट्रान्सप्लांटला संसर्गजन्य रोगांवरील उपचाराचा एक भाग म्हणून पाहिले जात नाही. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात असे प्रत्यारोपण अनोखेच ठरले आहे असे त्यांनी सांगितले. मायरानंतर त्यांनी 62 वर्षांच्या ब—ायन यांच्यावरही अशी शस्त्रक्रिया केली. त्यापूर्वी ते शंभर दिवस लाईफ सपोर्ट मशिनवर (जीवनरक्षक प्रणाली) अवलंबून होते. या दोन्ही रुग्णांनी म्हटले आहे की कोरोना विषाणू किंवा 'कोविड-19' हा आजार म्हणजे चेष्टामस्करी नाही. याविषयी लोकांनी वेळीच गंभीर होणे व स्वतःचा आणि इतरांचा बचाव करणे गरजेचे आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news