चंद्रावर उडत्या तबकड्या? | पुढारी

Published on
Updated on

वॉशिंग्टन : परग्रहवासीय आपल्या यानांमधून वेळोवेळी पृथ्वीवर येत असतात असा दावा अनेक लोक करतात. त्यांची ही याने बहुतांशी गोलाकार असल्याने मराठीत त्यांना 'उडत्या तबकड्या' असे म्हटले जाते. इंग्रजीत त्यांना 'यूफो' म्हणजेच 'अनआयडेंटिफाईड फ्लाईंग ऑब्जेक्टस्' (अनोळखी उडत्या वस्तू) असे म्हटले जाते. आता चंद्रावरही अशा यूफो पाहण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

चंद्राजवळून उडणार्‍या काही रहस्यमय वस्तू पाहण्यात आल्या. हा व्हिडीओ क्युबेक शहरातील एका  सायन्स फोटोग्राफरने बनवला आहे. 59 सेकंदांच्या या व्हिडीओला आतापर्यंत 4500 पेक्षाही अधिक लोकांनी पाहिले आहे. चंद्राच्या एका भागावरून दोन चमकदार व अज्ञात वस्तू जात असताना यामधून दिसते. त्यापैकी एका वस्तूची सावलीही पृष्ठभागावर पडत असताना दिसते व एकाची सावली दिसत नाही. या दोन वस्तूंच्या मागून आणखी तीन वस्तू येत असताना दिसून येते व नंतर या वस्तू रहस्यमयरीत्या गायब होतात. काही लोकांचे असे म्हणणे आहे की हे चंद्रावर राहणारे एलियन्स आहेत!  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news