एकेकाळी मंगळ होता बर्फाच्छादित | पुढारी

Published on
Updated on

न्यूयॉर्क : सध्याचा मंगळ कोरडाठाक आणि तांबूस दिसतो. मात्र, एके काळी हा ग्रह बर्फाच्छादित होता असे संशोधकांनी म्हटले आहे. शेजारच्या पृथ्वीप्रमाणेच या ग्रहावरही एके काळी बर्फाची चादर पसरली होती.

सुरुवातीच्या एक अब्ज वर्षांच्या काळात मंगळ कसा दिसत होता याबाबत संशोधन करण्यात आले. त्यामधून संशोधकांनी हे अनुमान लावले आहे. त्यासाठी मंगळावरील वेगवेगळ्या दर्‍या-खोर्‍यांचा अभ्यास करण्यात आला. पृथ्वीवर कॅनडाचा जो भाग आर्क्टिक म्हणजेच उत्तर ध्रुवाच्या वर्तुळात येतो तेथील डेव्हन बेटाशी साधर्म्य असणारी स्थिती मंगळावर होती असे संशोधकांचे मत आहे. अ‍ॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतील अ‍ॅना गॅलोफ्रे यांनी याबाबतची माहिती दिली. मंगळावर एके काळी वाहते पाणीही होते हे यापूर्वी सिद्ध झाले आहे. 

मंगळ अधिक ऊबदार बनल्यावर तेथील बर्फाचे आवरण वितळून असे झरे, नद्या निर्माण झाल्या असाव्यात असे संशोधकांना वाटते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news