जान्हवी ‘गुंजन सक्सेना’मय! | पुढारी

Published on
Updated on

मुंबई : 'धडक'मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेल्या जान्हवी कपूरचा आता 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. आता या चित्रपटातील पहिले गाणेही प्रसिद्ध करण्यात आले आहे. जान्हवीवर चित्रीत करण्यात आलेले हे 'भारत की बेटी' गाणेही लोकांना आवडत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जान्हवी 'गुंजन सक्सेना'मयच झाली आहे!

या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत जान्हवी अतिशय उत्सुक आहे. तिने या चित्रपटासाठी मेहनतही बरीच घेतली होती. तिच्या या गाण्यात मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पिता कसे योगदान देतो हे दर्शवले आहे. दोन मिनिटे आणि 25 सेकंदांच्या या गाण्यात अरिजीत सिंहने आपला आवाज दिला आहे. कौसर मुनीर यांनी हे गाणे लिहिले आहे. एका स्त्रीचा लढाऊ विमानांची पायलट बनण्यापर्यंतचा संघर्षमय प्रवास यामधून दाखवला आहे. कारगिल युद्धात मोलाची कामगिरी बजावणार्‍या हवाई दलाच्या पायलट गुंजन सक्सेना यांच्या शौर्यगाथेवर हा चित्रपट आधारित आहे. यामध्ये पंकज त्रिपाठी यांनी जान्हवीच्या पित्याची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 12 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news