हाँगकाँगमधील तरुणाला साडेचार महिन्यांनी पुन्हा कोरोना संक्रमण!

हाँगकाँग : एकदा कोरोनातून बरे झाल्यावर याबाबत बेफिकिर राहण्यासारखी स्थिती नाही हे आता हळूहळू समोर येत आहे. काही लोकांना कोरोना संक्रमणातून बरे झाल्यावरही आरोग्याची काही समस्या निर्माण झाल्याचे देश-विदेशात आढळले आहे. शिवाय कोरोनावर मात केल्यावरही काही काळाने पुन्हा संक्रमण होण्याच्याही केसेस समोर येत आहेत. आता हाँगकाँगमधील 33 वर्षांच्या आयटी व्यावसायिकाला दुसर्‍यांचा कोरोना संक्रमण झाले आहे. त्याच्या शरीरातील कोरोनाबाबतची प्रतिकारशक्‍ती अवघी साडेचार मशिनेच टिकली!

स्पेनमधून परतल्यावर त्याला पुन्हा कोरोनाने ग्रासले असून साडेचार महिन्यांच्या काळात त्याला आता दुसर्‍यांदा कोरोनाचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत रोगप्रतिकारक शक्‍तीबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. आतापर्यंत असे म्हटले जात होते की एकदा कोरोनातून बरे झाल्यावर दीर्घकाळासाठी शरीरात रोगप्रतिकारक शक्‍ती निर्माण होते. कोरोनाने आतापर्यंत त्याच्याबाबतच्या वेगवेगळ्या धारणा खोट्याच ठरवल्या असून आता ही धारणाही खोटी ठरू लागली आहे. हाँगकाँग युनिव्हर्सिटीचे मायक्रोबायोलॉजिस्ट केल्विन काय-वेंग यांनी याबाबतची माहिती दिली. आमच्या संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की 'कोविड-19' मधून बरे झाल्यावर निर्माण झालेली रोगप्रतिकारक क्षमता आयुष्यभर राहत नाही, उलट अतिशय लवकर पुन्हा संक्रमणही होऊ शकते. हाँगकाँगमधील 33 वर्षांचा तरुण याच महिन्यात युरोपमधून परतला होता आणि हाँगकाँग विमानतळावरच स्क्रीनिंगवेळी त्याची पीसीआर टेस्ट झाली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हे आश्‍चर्यकारकच होते, याचे कारण म्हणजे ही व्यक्‍ती साडेचार महिन्यांपूर्वीच कोरोनातून बरी झाली होती. केल्विन काय-वेंग यांनी म्हटले आहे की बरे झाल्यावरही आपल्याला पुन्हा संक्रमण होणार नाही या भ्रमात कुणी राहू नये. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हात धुणे सोडून देऊन चालणार नाही!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news