नेपाळमध्ये सापडली ३८०० वर्षांपूर्वीची मूर्ती

Published on
Updated on

काठमांडू : नेपाळच्या धुलीखेल येथे सुमारे 3800 वर्षांपूर्वीची मूर्ती सापडली आहे. जमिनीत सुमारे 300 मीटर खोलीवर ही मूर्ती होती. ही नेपाळमधील सर्वात जुन्या मूर्तींपैकी एक ठरली आहे. ही मूर्ती किरात देवीची असल्याचे म्हटले जात आहे.

पुरातत्त्व संशोधक श्रीकृष्ण धीमाल यांनी सांगितले की एका बांधकामासाठी करण्यात आलेल्या उत्खननात ही मूर्ती सापडली. स्थानिक लोक ही मूर्ती काढून पूजेसाठी घरी घेऊन जाणार होते. त्यावेळी त्यांच्याकडून ही दुर्मीळ व प्राचीन मूर्ती ताब्यात घेण्यात आली. किरात देवीची ही मूर्ती सुमारे 3800 वर्षांपूर्वीची आहे. अद्याप या मूर्तीचा तपशीलवार अभ्यास करण्यात आलेला नाही व आतापर्यंत केवळ अनुमानच वर्तवण्यात आलेले आहेत. ही मूर्ती ज्याठिकाणी सापडली तिथे पुरातत्त्वद़ृष्ट्या आणखी उत्खनन करण्यात यावे व याठिकाणी एक संग्रहालय उभे राहावे अशी आता मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news