एकाच फ्रेममध्ये निळा देवमासा! | पुढारी | पुढारी

एकाच फ्रेममध्ये निळा देवमासा! | पुढारी

सिडनी ः या पृथ्वीतलावरील सर्वात मोठा प्राणी म्हणजे ब्लू व्हेल किंवा निळा देवमासा. जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी असलेल्या हत्तीपेक्षा हा मासा अनेक पटीने अधिक मोठा असतो. त्याच्या केवळ जिभेचे वजनच एखाद्या हत्तीएवढे असते! अशा महाकाय माशाला समुद्रात न जाताही एकाच फ—ेममध्ये टिपण्यात एका फोटोेग्राफरला यश आले. ऑस्ट्रेलियात सिडनीजवळ या फोटोग्राफरने हे छायाचित्र कॅमेर्‍यात टिपले.

हा मासा क्वचित प्रसंगीच पाहायला मिळत असतो. अनेक संशोधक या माशाबाबत संशोधन करण्यासाठी खोल समुद्रातही जात असतात. मात्र, सिडनीमधील सियान या फोटोग्राफरला त्याचे छायाचित्र विनासायासच मिळाले! तो सिडनीच्या समुद्र किनार्‍याजवळ एरियल फोटोग्राफी करीत हंपबॅक व्हेलचे फोटो काढत होता. त्याचवेळी त्याच्या कॅमेर्‍यात योगायोगाने निळ्या देवमाशाचा फोटो क्लिक झाला. या माशाची लांबी 82 फूट आणि वजन सुमारे एक लाख किलो असल्याचे सांगण्यात येते. अर्थात अशाप्रकारे ब्लू व्हेलचा फोटो काढण्याची ही पहिलीच वेळ नाही. मात्र, सिडनीच्या किनार्‍याजवळ एकाच फ—ेममध्ये संपूर्ण ब्लू व्हेलचा फोटो टिपण्याची ही गेल्या शंभर वर्षांच्या काळातील तिसरीच वेळ आहे. सियान याने हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. शंभर टन वजनाच्या या माशाचा फोटो पाहून अनेक लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

 

Back to top button