2000 year old pot | दोन हजार वर्षांपूर्वीचे सोन्याने मढवलेले दुर्मीळ भांडे

2000 year old pot
2000 year old pot | दोन हजार वर्षांपूर्वीचे सोन्याने मढवलेले दुर्मीळ भांडे
Published on
Updated on

लंडन : सुमारे 200 वर्षांपूर्वी, वेल्समधील एका दलदलीच्या शेतात खोदकाम करत असताना एका कामगाराला जहाजाच्या आकाराचे एक दुर्मीळ, प्राचीन भांडे सापडले. जवळच्या किल्ल्याच्या नावावरून याला ‘केअरग्वर्ले भांडे’ असे नाव देण्यात आले आहे. हे सोन्याने मढवलेले भांडे ग्रेट ब्रिटनच्या मध्य कांस्ययुगात (सुमारे 1500 ते 1000 ईसपूर्व) सागरी प्रवासाला किती महत्त्व होते, हे दर्शवते.

हे भांडे सध्या वेल्समधील ‘म्युझियम वेल्स’च्या संग्रहात आहे. ते नैऋत्य इंग्लंडमधील काऊंटीजमधील शेल आणि कथील तसेच आयर्लंड किंवा वेल्समधील सोने वापरून बनवले गेले होते. आज मूळ भांड्याचा सुमारे अर्धा भागच शिल्लक आहे. जेव्हा ते पूर्ण होते, तेव्हा अंडाकृती भांडे सुमारे 18.2 सेंटीमीटर लांब आणि 7.8 सेंटीमीटर खोल होते. भांड्याच्या आतील बाजूस कोणतीही सजावट नाही, परंतु बाहेरील बाजू आणि कडा विविध आकारांच्या सोन्याच्या-फॉईलने आच्छादित कथीलने सुशोभीत केलेली आहेत.

संग्रहालय वेल्स च्या प्रतिनिधींच्या मते : तळाभोवतीचे झिग-झॅग (नागमोडी रेषा) लाटा दर्शवतात. लांब त्रिकोण वल्ही दर्शवतात. डोळ्याचे चिन्ह खलाशांना संरक्षण देण्यासाठी आहे. वर्तुळे शूर वीरांच्या ढाल दर्शवतात. 1980 मध्ये सागरी पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी या भांड्याच्या अभ्यासात थोडा वेगळा अर्थ लावला. सोनेरी कडेवरील समकेंद्रित वर्तुळे ढालीऐवजी, कांस्ययुगातील सूर्य-प्रतीकांमध्ये (जसे की नेब—ा स्काय डिस्क आणि नॉर्डिक ‘सन कॅरियट’) आढळणार्‍या जवळच्या साम्यामुळे सूर्य-प्रतीक मानली गेली. झिग-झॅग रेषा लाटांऐवजी, बोटीच्या लाकडी चौकटीवर ताणलेल्या कातड्यांमधून दिसणारी बोटीची लाकडी चौकट दर्शवू शकतात. या केअरग्वर्ले भांड्यावरील डिझाइनचा नेमका अर्थ काहीही असो, पण आयरिश समुद्राकडे वाहणार्‍या एलुन नदीजवळच्या दलदलीच्या शेतात ते सापडले. यावरून ते बोटीचे प्रतीक म्हणून तयार केले गेले असावे, असे संग्रहालय वेल्सचे मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news