डाळिंबात असतात कर्करोग रोधक गुणधर्म | पुढारी

डाळिंबात असतात कर्करोग रोधक गुणधर्म

नवी दिल्‍ली ः लालचुटुक डाळिंबाचे दाणे केवळ चवीलाच चांगले असतात असे नाही. त्यांच्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात व अनेक गंभीर आजारांपासून ते आपल्याला दर ठेवू शकतात. कर्करोगाचा सामना करणारे गुणधर्मही डाळिंबामध्ये असतात. डाळिंबातील अँटिऑक्सिडंटस्चे प्रमाण ग्रीन टी किंवा रेड वाईनमधील अँटिऑक्सिडंटच्या तुलनेत तिप्पट असते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

हे अँटिऑक्सिडंटस् प्रदूषण, धूम—पानामुळे होणार्‍या हानीपासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. याशिवाय कर्करोगासारख्या गंभीर आजारास कारणीभूत ठरू शकणारा डीएनएमधील बिघाडही दुरुस्त करतात. प्रोस्टेट, ब—ेस्ट, लंग आणि कोलोन कॅन्सरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डाळिंब उपयुक्‍त आहे. डाळिंबाचा ज्यूस हा ‘एलडीएल (घातक) कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी, बीपी कमी करण्यासाठी उपयुक्‍त आहे. कोणत्याही फळाचा ज्यूस केल्याने त्याच्यामधील फायबर म्हणजेच तंतुमयता नाहीशी होते.

हीच बाब डाळिंबाला लागू पडते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनसंस्था सुधारते. त्यामुळे डाळिंबाचा ज्यूस काढण्याऐवजी दाणे खाल्ल्याने अधिक लाभ मिळतो. दीड कप डाळिंबाच्या दाण्यांमध्ये 72 कॅलरीज, 3.5 ग्रॅम फायबर, 14 ग्रॅम कार्बोहायड्रेट आणि केवळ 12 ग्रॅम शुगर असते. शिवाय फोलेट, व्हिटॅमिन के, इ, बी-6 तसेच पोटॅशियम असते.

Back to top button