पुढारी वृत्तसेवा : एके काळी हीरोईनना नृत्य शिकवणारी नोरा फतेही स्वतःच एक अभिनेत्री झालेली आहे. तिचे सौंदर्य, अफलातून नृत्यकौशल्य व विशेषतः बेली डान्सचे अनेक दिवाने आहेत. तिचे अनेक फोटोही सोशल मीडियात व्हायरल होत असतात. आताही तिचे नारंगी पोशाखातील फोटो व्हायरल झाले आहेत. या ऑरेंज ड्रेसला मॅच होणारे सोन्याचे दागिने तिने परिधान केले होते.
'डान्स दिवाने ज्युनिअर'च्या सेटबाहेर तिने या पोशाखात फोटोशूट केले. ती या शोमध्ये नितू कपूर आणि मार्झी पेस्तोनजी यांच्यासमवेत परीक्षकाच्या भूमिकेत आहे. मूळची कॅनडाची असलेली नोरा 'रोअर ः टायगर्स ऑफ सुंदरबन्स' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये आली होती. हिंदीशिवाय तिने तेलगू, तामिळ व मल्याळी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. अनेक टी.व्ही. शोमधूनही ती झळकलेली आहे.