कोणतेही कायदे-नियम नसलेले शहर!

कोणतेही कायदे-नियम नसलेले शहर! www.pudharinews.
कोणतेही कायदे-नियम नसलेले शहर! www.pudharinews.
Published on
Updated on

वॉशिंग्टन ः काही देशांमध्ये भलतेच कडक कायदे आहेत तर काही ठिकाणी अतिशय विचित्र कायदेही आहेत. अर्थात कायदे-नियमांशिवाय समाजव्यवस्था पूर्ण होत नाही. मात्र, एक ठिकाण असे आहे जे पूर्णपणे 'कायदेमुक्‍त' आहे. याठिकाणी कोणता करही भरावा लागत नाही की भाडेही द्यावे लागत नाही. याठिकाणी कसलाही नियम नाही. या ठिकाणाला पृथ्वीची 'लॉ लेस सिटी' किंवा 'स्लॅब सिटी' असेही म्हटले जाते!

एका टीव्ही चॅनेलचे होस्ट बेन फोगल यांनी एका कार्यक्रमात याबाबतची माहिती सांगितली आहे. त्यांनी स्वतः या स्लॅब सिटीत जाऊन हे ठिकाण पाहिले होते. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये हे ठिकाण आहे. तिथे कोणतेही नियम किंवा कायद्यांचे अस्तित्व नाही. तसेच 'सरकार' किंवा 'प्रशासन'ही तिथे नाही. या भागात असेच लोक राहतात जे एक तर कायद्यापासून वाचण्याचा प्रयत्न करीत आहेत किंवा कोणत्या तरी मानसिक त्रासाने ग्रस्त आहेत.

याठिकाणी बंदुका आणि ड्रग्जची विक्री सर्रास सुरू असते आणि तिथे त्यांना कुणीही रोखत नाही. वाळवंटी भाग असलेल्या या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, गॅस, वीज वगैरे कोणत्याही सुविधा नाहीत. दुसर्‍या महायुद्धादरम्यान अमेरिकन सैनिकांनी प्रशिक्षणासाठी ही जागा बनवली होती जी 1956 मध्ये उद्ध्वस्त करण्यात आली. ही जागा ढिगार्‍यांच्या ठिकाणात बदलली होती जी हळूहळू भटक्या लोकांचे आश्रयस्थान बनली. येथे राहणारे लोक सामाजिकद‍ृष्ट्या इतरांशी तुटलेले आहेत. या लोकांचा जगाशी कोणताही संबंध राहिलेला नाही.

तिथे घड्याळ किंवा कॅलेंडरही नाही. टीव्ही किंवा अन्यही आधुनिक साधने नसल्याने या लोकांना जगात काय घडत आहे हे समजत नाही. गुन्हे करून पळून गेलेले अनेक लोक याठिकाणी राहतात. अनेक लोक विचित्र कपडे परिधान करतात व विचित्र पद्धतीने राहतात. जगाला वेळोवेळी कायदे व नियमांचे उपदेश देणार्‍या अमेरिकेत कॅलिफोर्नियासारख्या भागातच हे ठिकाण आहे यासारखी दुसरी आश्‍चर्याची बाब नाही!

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news