1800 वर्षांपूर्वीच्या ग्लॅडिएटरचे पुरावे

या पुरुषाचे वय मृत्युसमयी 26 ते 35 वर्षे
1800-year-old-gladiator-evidence-discovered
1800 वर्षांपूर्वीच्या ग्लॅडिएटरचे पुरावेPudhari File Photo
Published on
Updated on

लंडन : इंग्लंडमधील यॉर्क शहरात 1800 वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या एका व्यक्तीच्या सांगाड्यावर मोठ्या मांसाहारी प्राण्याचे (बहुधा सिंहाचे) चावे असल्याचे नव्या अभ्यासातून समोर आले आहे. या व्यक्तीवर रोमन काळात ग्लॅडिएटर म्हणून प्राण्याशी झुंजताना हल्ला झाला असावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

या संशोधनात सांगितले आहे की, या पुरुषाचे वय मृत्युसमयी 26 ते 35 वर्षे दरम्यान होते. त्याचा सांगाडा एका अशा स्मशानभूमीत सापडला आहे, जिथे इतर ग्लॅडिएटर्सचीही प्रेतस्मशाने आहेत. रोमन काळात ही जागा एबोराकम म्हणून ओळखली जात होती, जे आजचे यॉर्क शहर आहे. तथापि, या निष्कर्षांवर काही तज्ज्ञांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. संशोधनात सहभागी नसलेल्या एका विद्वानाने सांगितले की, ही व्यक्ती ग्लॅडिएटर नसून, एखादा शिक्षा दिलेला कैदी असावा, ज्याला प्राण्याच्या समोर फेकले गेले असावे.

संशोधनात असेही नमूद आहे की, या व्यक्तीचे शिरकाण झाले होते, तो मरण्याच्या स्थितीत असताना किंवा मृत झाल्यानंतर. ‘ही शिरच्छेदाची क्रिया त्या व्यक्तीच्या मृत्यूला त्वरित दिलासा देण्यासाठी, किंवा प्रथेनुसार केली असावी,’ असे अभ्यासकांनी झङजड जपश या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या लेखात नमूद केले आहे. या व्यक्तीचा सांगाडा 2005 मध्ये उत्खनन करून बाहेर काढण्यात आला होता.

अभ्यासाचे सहलेखक आणि किंग्स कॉलेज लंडनचे पुरातत्त्व तज्ज्ञ जॉन पिअर्स म्हणतात की, या व्यक्तीची दोन शक्य ओळखी आहेत, एक प्रशिक्षित ग्लॅडिएटर ज्याने शस्त्राने सिंहाशी लढा दिला किंवा शिक्षा झालेला एक कैदी जो निःशस्त्र किंवा बांधलेल्या अवस्थेत लढला. पिअर्स यांच्या मते, तो ग्लॅडिएटर असण्याची शक्यता अधिक आहे.

या स्मशानभूमीत सापडलेल्या इतर सांगाड्यांवरही अशाच प्रकारच्या जखमा आहेत, ज्या वारंवार झुंजीचे संकेत देतात. ‘या सांगाड्यांवर जुन्या जखमांचे पुरावे सापडले आहेत, जे वारंवार झालेल्या लढ्यांचे द्योतक आहेत,’ असे आयर्लंडच्या मायनूथ विद्यापीठाचे टिमोथी थॉम्पसन म्हणाले. या लढाईचा संभवतः कोणत्यातरी अ‍ॅम्फीथिएटरमध्ये शेवट झाला असावा. यॉर्क शहर त्या काळी एक महत्त्वाचे रोमन केंद्र होते आणि तिथे किमान एक अ‍ॅम्फीथिएटर असणे शक्य आहे, तरी त्याचे नेमके स्थान अद्याप अस्पष्ट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news