Student Innovation | सोळा वर्षीय विद्यार्थ्याने साध्या पंख्याचे रूपांतर केले एअर प्युरिफायरमध्ये

अवघ्या १४० रुपयांत तयार केला खास फिल्टर
Student Innovation |
Student Innovation | सोळा वर्षीय विद्यार्थ्याने साध्या पंख्याचे रूपांतर केले एअर प्युरिफायरमध्ये
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : ज्या लोकांना महागडे एअर प्युरिफायर खरेदी करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी दिल्लीच्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याने प्रदूषणाचा सामना करणे सोपे केले आहे. कृष अग्रवाल आणि त्याचा मित्र समर्थ मित्तल यांनी मिळून ‘प्रोजेक्ट वायू’ सुरू केला आहे, ज्याद्वारे एका साध्या पंख्याला एअर प्युरिफायरमध्ये रूपांतरित करता येते. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य केवळ इतकेच नाही की यामुळे घर किंवा खोलीतील प्रदूषण खरोखरच कमी होऊ शकते, तर या अनोख्या संशोधनाचा एकूण खर्च केवळ १४० रुपये इतका आहे. या विशेष आविष्कारासाठी कृषला प्रतिष्ठित ‘डायना ॲवॉर्ड २०२६’ने देखील सन्मानित करण्यात आले आहे.

‘प्रोजेक्ट वायू’ अंतर्गत १६ वर्षीय कृषने एक खास प्रकारचा फिल्टर तयार केला आहे, जो कोणत्याही सामान्य पंख्यावर सहज बसवता (फिट) येतो. यामध्ये ‘इलेक्ट्रोस्टॅटिकली चार्ज्ड फायबर’चा वापर करण्यात आला आहे. प्रदूषित हवा आणि धूळ-मातीचे अत्यंत सूक्ष्म कण सहजपणे शोषून घेणे, हे या फायबरचे मुख्य वैशिष्ट्य आहे. पंखा सुरू होताच हा फिल्टर एखाद्या फुग्यासारखा फुगतो. यामुळे हवा स्वच्छ करणाऱ्या फिल्टरची व्याप्ती वाढते आणि हळूहळू संपूर्ण खोलीतील हवा गाळून स्वच्छ होते.

‘प्रोजेक्ट वायू’ किती उपयुक्त आहे?

‘प्रोजेक्ट वायू’ अंतर्गत तयार केलेल्या या फिल्टरची किंमत अवघी १४० रुपये आहे; परंतु ते स्वस्त असल्यामुळे प्रदूषण कमी करण्याच्या त्याच्या क्षमतेला कमी लेखता कामा नये. एका बंद खोलीत या फिल्टरची चाचणी घेतली असता असे दिसून आले की, हा फिल्टर हवेतील PM2.5 चे प्रमाण तब्बल ९० टक्क्यांपर्यंत कमी करतो. वास्तविक पाहता, चाचणीदरम्यान खोलीतील प्रदूषणाची पातळी १५८ मायक्रोग्राम प्रति घनमीटर इतकी होती, जी फिल्टर सुरू केल्यानंतर अवघ्या एका तासानंतर घसरून फक्त ११ मायक्रोग्राम प्रति घन मीटरवर आली. हा फिल्टर गरजेनुसार वेळोवेळी बदलताही येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.